गणेशोत्सवातून सामाजिक संदेश! देखाव्यातून साकारला महिला सुरक्षिततेचा संदेश
विजय काते, भाईंदर: सध्या गणेशोत्सवाचा उत्साह सुरु असून घरघुती गणपती देखाव्यांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवून समाज प्रबोधन करत आहे. मीरारोड येथील कांबळे कुटुंबीय मागील 16 वर्षांपासून आपल्या गणेशोत्सवाच्या देखाव्यातून विविध सामाजिक संदेश दिला आहे. यावर्षी कांबळे कुटुंबीयांनी सध्या संपूर्ण जगात पेटून उठेलेला विषय म्हणजे महिलांनावरील होणाऱ्या अत्याचारबाबत मुलींनी, महिलांनी स्वतःचे रक्षण करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत महत्त्व पटवून देणार संदेश देण्यात आला आहे.
कांबळे कुटुंबीयांनी आतापर्यंत स्त्री भृण हत्या, सोशल मीडियाचा अतिवापर आणि त्याचे दुष्परिणाम, हुंडाबळी असे विविध सामाजिक संदेश गणेशोत्सवाच्या माध्यमातून साकारले आहेत. यावर्षीही महिलांनावरील अत्याचार थांबण्यासाठी स्त्रियांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, असा संदेश कांबळे कुटुंबियांनी दिला आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कांबळे कुटुंबीयांच्या गणेशोत्सवाला परिसरातील भाविकांनी एकच गर्दी केली.विशेष म्हणजे यां संदेशामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःचं रक्षण कसे करता येईल याबाबत सांगण्यात आले आहे.
यामध्ये महिलांनी घर सोडण्यापूर्वी, तुमचा फोन पूर्णपणे चार्ज करा आणि तुमच्या फोनची GPS सिस्टीम नेहमी चालू ठेवा, जेणेकरून तुम्ही कोणतेही सुरक्षा अॅप डाउनलोड केले असल्यास, गरज पडल्यास ते तुम्हाला मदत करू शकेल. अनेक वेळा आपण पटकन घरी पोहोचण्यासाठी शॉर्टकट घेतो. कालही त्याच मार्गावरून गेल्यावर सर्व काही ठीक झाले असे आम्हाला वाटते, पण आजही सर्व काही ठीक होईल याची खात्री नसते. तुमची सुरक्षा तुमच्या हातात आहे. त्यामुळे, कोणत्याही निर्जन रस्त्याने किंवा शॉर्टकटवरून जाण्याऐवजी, मुख्य रस्त्याचा वापर करा जिथे तुम्हाला फिरती रहदारी मिळेल.ऑटो किंवा कॅबमध्ये चढण्यापूर्वी, आपल्या मोबाइल फोनसह वाहनाच्या नंबर प्लेटचा फोटो घ्या आणि तो तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला पाठवा.
ऑटो कोड आणि त्याचा नंबर लक्षात ठेवण्याचा प्रयन करा.जेव्हा तुम्ही कॅब किंवा ऑटोमध्ये ड्रायव्हरसोबत एकटे असता तेव्हा तुमच्या भावंडाला, पतीला किंवा मित्राला कॉल करा आणि त्यांना तुमच्या घरी परतण्याच्या वेळेबद्दल कळवा, जेणेकरून थोडा विलंब झाला तरी ते तुमच्याशी संपर्क साधू शकतील तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देत का हे प्रकार वाढत चालले आहेत ??? मागील १० ते १५ वर्षात पहिलेही अशा घटना घडायच्या पण अल्प प्रमाणात, आता खूपच प्रमाण वाढले आहे, पण का ?? कारण याला जबाबदार आहे आता घरात सहज उपलब्ध झालेला स्मार्ट टीव्ही आणि फालथू वेबसिरीज, तसेच प्रत्येकाच्या हातात असणारा एंड्राइड मोबाईल आणि त्याला ब्राऊस करायला भेटलेला नो Age limit access, हा लेख लिहायचा खटाटोप एकच आपल्या मुलांना या सर्वा पासून शक्यतेवढे लांब ठेवा.
आधुनिक शिक्षणासोबतच अध्यात्मिक तसेच सामाजिक वर्तणुकीचेही शिक्षण द्या, प्रत्येक स्त्री मधे आई आणि बहिण बघण्याची (शिवाजी महाराज संस्कृती) जागवूया आणि नवीन भारत घडवण्याचा निर्धार करूया.शिवाजी महाराजांच्या यशामागे होती त्यांची जिजाऊ आता सगळ्या जिजाऊंना गरज आहे शिवाजी महाराजांसारख्या विचारांचीजो देईल तिची साथ आणि प्रगती करण्याची एक संधी असा संदेश देण्यात आला.गणेशोत्सवातील देखावे आकर्षक व्हावे यासाठी अनेक गणेश मंडळ रात्रं-दिवस मेहनत करत असतात. मात्र दुसऱ्या बाजूला कमी खर्चात कमी वेळेत सामाजिक बांधिलकी म्हणून राऊत कुटुंबीय मागील अनेक वर्षांपासून समाजाला बोध घेता येईल असे सामाजिक संदेश देणारे चलचित्र देखाव्यातून सादर करत समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे.