मुंबई : आशियातील पहिल्या महिला लोको पायलट (Asia’s First Woman Loco Pilot) सुरेखा यादव (Surekha Yadav) यांनी आज सोलापूर ते सीएसएमटी (Solapur To CSMT) ही वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) ट्रेन चालविली.
आज (१३ मार्च २०२३) रोजी सोलापूर-CSMT वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचे सारथ्य करताना पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी मध्य रेल्वेच्या शिरपेचात एक महिला वंदे भारत एक्सप्रेस लोको पायलट म्हणून नाव कोरले. सुरेखा यादव यांचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक ८ वर सत्कार करण्यात आला.
[read_also content=”पलावा येथील २५ हजार फ्लॅट धारकांना बजावलेली जप्तीची नोटिस मागे घ्या; MNS आमदार राजू पाटील यांनी KDMC आयुक्तांना घातले साकडे https://www.navarashtra.com/maharashtra/withdraw-the-forfeiture-notices-issued-to-25000-flat-holders-in-palava-mns-mla-raju-patil-sued-the-kdmc-commissioner-nrvb-375875.html”]
सुरेखा यादव म्हणाल्या की, नवीन काळातील, अत्याधुनिक तंत्रज्ञान वंदे भारत ट्रेनचे पायलट करण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञ आहे. गाडी योग्य वेळी सोलापूरहून निघाली आणि वेळेच्या ५ मिनिटे आधीच सीएसएमटीला पोहोचली.
ट्रेन चालविणे, शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये सिग्नल पाहणे, नवीन उपकरणे वापरणे, इतर क्रू मेंबर्ससोबत समन्वय, ट्रेन चालवण्यासाठी सर्व पॅरामीटर्स पाळणे यांचा समावेश होतो.
[read_also content=”मनी लाँड्रिंग खटला प्रकरण : ईडी कारवाई विरोधात हसन मुश्रीफ उच्च न्यायालयात उद्या तातडीने सुनावणी निश्चित https://www.navarashtra.com/maharashtra/money-laundering-case-urgent-hearing-scheduled-tomorrow-in-hasan-mushrif-high-court-against-ed-action-nrvb-375869.html”]
महाराष्ट्रातील सातारा येथील, सुरेखा यादव या, १९८८ मध्ये भारतातील पहिल्या महिला रेल्वे चालक बनल्या. त्यांच्या कामगिरीसाठी, त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.