Airtel Recharge Plan: एकदा रिचार्ज करा आणि वर्षभर टेंशन फ्री राहा! अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार हे फायदे, केवळ इतकी आहे प्लॅनची किंमत
कंपनीचे हे प्लॅन्स खरेदी करण्याचा फायदा म्हणजे यूजर्सना अत्यंत कमी पैशांमध्ये वर्षभराची व्हॅलिडीटी असलेले रिचार्ज प्लॅन खरेदी करण्याची संधी मिळते. इतकंच नाही तर या प्लॅनमध्ये यूजर्सना इतर फायदे देखील मिळतात. तुम्ही देखील एअरटेल यूजर असाल आणि तुम्हाला देखील दिर्घकाळ व्हॅलिडीटी ऑफर करणारे रिचार्ज प्लॅन खरेदी करायचे असतील ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
भारती एयरटेलचा हा रिचार्ज प्लॅन त्यांच्या यूजर्सना 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करते. या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण भारतातील कोणत्याही नंबरवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. या प्लॅनमध्ये यूजर्सना फ्री नॅशनल रोमिंग आणि 3600 एसएमएस देखील ऑफर केले जातात. गेल्यावर्षी कंपनीने हा रिचार्ज प्लॅन लाँच केला होता. 1849 रुपयांचा रिचार्ज प्लॅन हा केवळ कॉलिंग आणि मेसेज ओन्ली प्लॅन आहे. म्हणजेच या प्लॅनमध्ये यूजर्सना डेटा ऑफर केला जात नाही. जर तुम्हाला डेटाची आवश्यकता असेल तर तुम्हाला दुसरा डेटा पॅक खरेदी करावा लागणार आहे.
एयरटेलचा हा प्रीपेड रिचार्ज प्लॅन देखील त्यांच्या यूजर्सना 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करते. या प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री नॅशनल रोमिंगचे फायदे मिळतात. कंपनी त्यांच्या 2249 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 3,600 फ्री एसएमएस ऑफर करते. बेसिक स्मार्टफोन यूजर्सना या प्लॅनमध्ये एकूण 30GB डेटा ऑफर केला जातो. वापरकर्ते हा डेटा कधीही वापरू शकतात, त्यासाठी कोणतीही दैनिक मर्यादा निश्चित केलेली नाही.
या दोन स्वस्त रिचार्ज प्लॅन व्यतिरिक्त कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये आणखी एक रिचार्ज प्लॅन आहे, जो यूजर्सना 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करतो. या प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंग, फ्री नेशनल रोमिंग सारखे फायदे मिळणार आहेत. एअरटेल त्यांच्या या दिर्घकाळ व्हॅलिडीटी ऑफर करणाऱ्या प्लॅनमध्ये डेली 2GB हाय स्पीड डेटा ऑफर करणार आहे. याव्यतिरिक्त, यूजर्सना अनलिमिटेड 5 जी डेटाचा फायदा होतो. या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएस फायदे देखील मिळतात.






