गोकुळमध्ये सत्तेचे बदलणार समीकरण ?! हसन मुश्रीफांचा 'मास्टरस्ट्रोक' की मित्रपक्षांची कोंडी?
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ज्याच्याकडे जितके ठराव, त्याला तेवढ़या जागा हा फॉर्म्युला पुढे केल्याची राजकीय वर्तुळात जोरदार वचर्चा आहे. प्रत्येक १५० ठरावांमागे एक उमेदवारी या समीकरणामुळे महायुतीतील पारंपरिक सरसकट जागावाटपावा फॉर्म्युला धुळीस मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. २५ संचालक पदांसाठी लढत होत असताना, कोणत्याही पॅनेलला निर्णायक आघाडी घ्यायची असेल तर किमान १४०+ ठरावांची भक्कम साखळी उभी करावी लागणार आहे. त्यामुळे सध्या संचालकपदाचे इच्छुक ठसवधारकांव्या दारात ठाण मांडून बसल्याचे चित्र आहे.
महापालिका नगरपालिका पद्धतीप्रमाणे समान वाटा मिळावा, यासाठी महायुतीतील काही नेते मुंबई पातळीवर लॉबिंग करत असल्याची चर्चा आहे. मात्र, मागील पाच वर्षांत वाढलेल्या सभासदांमध्ये मुश्रीफ गटाचे ठराव लक्षणीय असल्याने त्यांचा वरचष्मा स्पष्ट दिसत आहे. (Kolhapur Politics)
पंचवीस वर्षे सत्तेत असलेल्या महाडिक गटासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरत आहे. धनंजय मंडलिक, नरके आणि प्रकाश आबिटकर गटालाही ठरावांच्या गणितात पिछाडीवर पडण्याची भीती सतावत आहे. ठरावांची ताकद हा मुद्दा पुढे करत मुश्रीफांनी महायुतीतील इतर नेत्याना कोडीत पकडल्याचा कयास राजकीय वर्तुळात बांधला जात आहे.
धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; आरोपीने कुटुंबियांनाही दिली जीवे मारण्याची धमकी
गोकुळची निवडणूक ही मतांपेक्षा ठरावावर अवलंबून असल्याने पुढील आठ दिवसांत मोठ्या राजकीय हालचाली होण्याची शक्यता आहे, महायुती एकदिलाने रणांगणात उतरणार की ठरावांच्या फॉर्म्युल्यावरून अंतर्गत धुसफूस उफाळणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. एकूणच, ‘गोकुळ’व्या या निवडणुकीत मतपेटीपेक्षा ठरावांची पेटी जड तरणार हे स्पष्ट झाले आहे, ज्याच्या गळ्यात ठरावांची माळ, त्याच्याच कपाळावर यंदा विजयाचा गुलाल उडणार, अशीच राजकीय चर्चा रंगली आहे,






