काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील आरोपीचे नाव सतीश चव्हाण असे आहे. तर मृत्यु झालेल्या विवाहितेचे नाव निकिता राठोड (वय अंदाजे २२) असे नाव आहे. निकिता ही सतीशच्या सख्ख्या मामाची मुलगी आहे. विवाहानंतर दोघेही कर्नाटकातील गुरबर्गा येथून रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात आले होते. येथे चिरेखाणीवर मजुरीचे काम करत होते. सुरुवातीला दोघांचे संसारिक आयुष्य सुरळीत सुरू होते. मात्र काही दिवसांतच सतीशने निकिताच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. यावरून सतत दोघांमध्ये वाद होत होते.
सतीश निकितावर माहेरून पैसे आणण्याचा तगादा सतीश लावत होता. पैश्यांवरून आणि संशयातून तो तिला शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याची माहिती निकिताच्या नातेवाईकांनी दिली. घटनेच्या दिवशी दोघांमध्ये तीव्र वाद झाला. संतापाच्या भरात सतीशने निकितावर हल्ला केला. या हल्ल्यात निकिताचा मृत्यू झाला. एवढेच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेह जवळील जंगल भागात नेऊन टाकले.
त्यांनतर निकिता बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी तक्रार दाखल होताच तपासाला सुरुवात झाली. चौकशी दरम्यान सतीशची विधाने विसंगत आढळल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी जंगल परिसरातून निकिताचा मृतदेह हस्तगत करण्यात आला आहे.
सतीश विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
भांडुप हादरलं! खेळायला गेलेल्या 14 वर्षीय मुलाचा तलावात मृतदेह, पोस्टमार्टम अहवालानं उघडला खूनाचा प्रकार
मुंबईच्या भांडुप येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलांनीच अल्पवयीन मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे. मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव सिद्धार्थ लोंढे ( 14 वर्ष) असे आहे. त्याच्या तीन अल्पवयीन मित्रांनीच त्याची हत्या केली असे तपासात निष्पन्न झाले आहे. सिद्धार्थचा मृतदेह मुलुंडच्या विहार तलावाजवळ आढळून आला. सुरुवातीला हा अपघात असल्याचे वाटले, मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हत्या असल्याचे स्पष्ट झाले.
धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; आरोपीने कुटुंबियांनाही दिली जीवे मारण्याची धमकी
Ans: रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात.
Ans: चारित्र्याच्या संशयातून आणि वादातून घटना घडल्याची माहिती.
Ans: आरोपी पतीला अटक; खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू.






