नवी मुंबई : ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) आज प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला. खारघरमध्ये वीस ते पंचवीस लाख अनुयायी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या पुरस्कारावेळी शाल, मानपत्र, 25 लाखांचा धनादेश आणि मानचिन्ह तसेच 10 फुटांचा गुलाबाचा हार, आप्पासाहेब धर्माधिकारी यांना श्रीसेवकांच्या वतीनं देण्यात आला. दरम्यान, व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (CM) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM), मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार श्रीकांत शिंदे आदी नेते व मंत्री उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मागील पंधरा दिवसांपासून जोरदार व जय्यत तयारी सुरु होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून धर्माधिकारी यांचे लाखोंच्या संख्येनं अनुयायी खारघरमध्ये दाखल झालेत.
मी श्रीसेवकांमधीलच सदस्य – मुख्यमंत्री
महासागरासमोर काय बोलावं हे शब्द सुचत नाहीत. मुख्यमंत्री म्हणून उभा नाही. परिवारातला श्रीसदस्य म्हणून या ठिकाणी उभा आहे. सर्वोच्च मानाचा पुरस्कार अप्पासाहेबांना, गृहमंत्र्यांनी अर्पण केलेला आहे. राज्याच्या साडे बारा कोटी जनतेच्या वतीनं शुभेच्छा आणि अभिनंदन करतो. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की, जिकडे नजर जाईल, तिकडे श्रीसेवक बसले आहेत, हे एक जागतिक रेकॉर्ड आहे. आप्पासाहेबांच्या रुपाने मला त्यांच्यात देवच दिसतो. याच मैदानात नानासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला होता. आणि त्याच मैदानात आज आप्पासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळत आहे, हा दैवी योग आहे. आप्पासाहेबांच्या कामांची दखल केंद्र सरकारने देखील घेतली आहे. या राज्याची, देशाची सेवा करण्याचे काम आप्पासाहेबांचे लाखो सदस्य जगभरात करताहेत. चारशे वर्षापासून लोकांना दिशा देण्याचे काम करताहेत, ज्ञानाची ज्योती घराघरात लावण्याचे काम धर्माधिकार कुटुंब करत आहे. जेव्हा माझ्यावर दु:खाचा डोंगर कोसळसा तेव्हा, धर्माधिकारी कुटुंबाने मला पाठिंबा दिला, माझ्या पाठीशी राहिले म्हणून मी आज तुमच्यासमोर उभा आहे. म्हणून आज महासागर पसरला आहे. सागरालाही लाजवेल असा आज जनसागर पसरला आहे. कडवट राष्ट्रभक्त आहेत.
तीनशे सत्तर कलम…
देशातील लाखो, करोडो लोकांची इच्छा होती की, काश्मीरमधील 370 कलम हटविले पाहिजे. ते कलम मोदींनी, अमित शहांनी हटवले. त्यामुळं मी त्यांचे आभार मानतो. आज गृहमंत्र्यांचे हस्ते आप्पासाहेबांच्या सत्कार होतोय, हा दुग्धसर्करा योग आहे. अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, वक्षारोपण, हुंडाबळी आदी कामं आप्पासाहेब धर्माधिकारी व श्रीसेवकांचे कार्य केली आहेत. माणसे घडविण्याचे विद्यापीठ म्हणजे आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे प्रतिष्ठान आहे. आज आदरणीय गृहमंत्री तुम्ही आलात, त्याबद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद. जेव्हा तुम्ही येता, उभे राहता, त्याचा अनुभव मी व देवेंद्रजींनी घेतला आहे. हा पुरस्कार आप्पासाहेबांना दिल्यामुळं या पुरस्काराची उंची वाढली आहे. मी मुख्यमंत्री असताना, हा पुरस्कार दिला जातोय, याचा मला अभिमान वाटतो, हे माझे भाग्य आहे, असं मुख्यमंत्री एकनात शिंदे म्हणाले.
सूर्य आग ओकत असतानाही…
जनतेचा महासागर या ठिकाणी लोटलेला आहे. सूर्य आग ओकत असताना, एकही माणूस जागचा उठत नाही. ही अप्पासाहेबांची ताकद आणि आशीर्वाद आहेत. श्री सदस्यांच्या बैठकीची शिस्त काय असते. ती या ठिकाणी पाहायला मिळते आहे. माझी पत्नी आणि श्रीकांत देखील या श्री सदस्यांमध्ये बसलेले आहेत. इथं मोठा कुणी नाही, सगळे श्री सदस्य आहे. हा जनसागर अप्पासाहेबांच्या प्रेमापोटी परवापासून इथं पोहचलेला आहे. ही शक्ती आहे. ही अप्पासाहेब यांची जादू आहे. हे पाहायाचं भाग्य आम्हाला लाभलंय. हे नववं आश्चर्य आहे. सत्तेपेक्षा आध्यात्मिक सत्ता मोठी असते, त्याचं हे स्वरुप आपम पाहतय. राजकीय अधिष्ठाना अध्यात्मिक अधिष्ठानाची साथ लागते. ते आपम पाहतोय. ही गर्दी विक्रम मोडणारी आहे. याचं रेकॉर्ड मोडायचं असेल तर ते श्री सदस्यच मोडू शकतात. अप्पासाहेबांना २०१७ साली पद्मश्री मिळाला होता. त्यासाठी गृहमंत्री शाहा आणि नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देतो, अभिनंदन करतो.
धर्माधिकारी घराण्याची 400 वर्षांपासून सेवा
धर्माधिकारी घराणं गेल्या 400 वर्षांपासून सेवा करतंय. ज्ञानाच्या ज्योती घराघरात लावण्यासाठी मोठं योगदान. भरकटणाऱ्या कुटुंबांना दिशा देण्याचं काम यांनी केलंय. या लाखो कुटुंबात माझंही एक कुटुंब होतं. माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं त्यावेळी दिघेंनी आधार दिला. त्यावेळी अप्पासाहेबांनी मला सामाजिक कामासाठी मार्गदर्शन केलं. माझ्या जडणघडणीत अप्पासाहेबांचं मोठं योगदान आहे. अनेकांना दिशा देण्याचं काम त्यांनी केलंय. म्हणूनच हा महासागर पसरलाय, सागरालाही लाजवेल, याचे आपण साक्षीदार आहेत. ठिपक्यांनी रांगोळी तयार होते, त्याच प्रमाणे हे महासागराचं काम आहे. अरे माणसा माणसा कधी होशील माणूस. ही ओळ. हे कार्य अप्पासाहेब करतायेत. माणूस घडवण्याचं विद्यापीठ म्हणजे मुक्काम पोस्ट रेवदंडा आहे.