धारणी : धरणी येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेण्यात आले. त्यानंतर तिला जंगलातील शेतशिवारात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual assault ) करण्यात आला. तसेच, तिच्यासोबत त्यांनी अनैसर्गिक कृत्य (Unnatural act) सुद्धा केले. हा धक्कादायक प्रकार धारणी पोलीस ठाण्याच्या (Dharni Police Station) हद्दीत १३ ऑगस्ट रोजी उघडकीस आला.
या घटनेची तक्रार २९ वर्षीय महिलेने १३ ऑगस्ट रोजी धारणी पोलीस ठाण्यात नोंदविली. त्यानुसार, पोलिसांनी आरोपी प्रदीप बाबू कास्देकर (२५, रा. धारणी) याच्याविरुध्द अपहरण करणे, लैंगिक अत्याचार करणे तसेच अनैसर्गिक कृत्य करणे आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (Child Sexual Abuse Prevention Act) गुन्हा नोंदविला आहे.