पुणे- भावाच्या घरी निघालेल्या १४ वर्षीय मुलीचे चाकूच्या धाकाने दुचाकीवरून अपहरणकरून जंगलात नेहून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लुल्लानगरमधील केंद्रीय महाविद्यालय परिसरातील जंगलात हा प्रकार सायंकाळी सातच्या सुमारास घडला आहे. याघटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी मेहंदी जाफर इराणी (वय २०, कुमार पल्म्स, धर्मावत पेट्रोल पंपाजवळ उंड्री-पिसोळी) याला अटक केली आहे.
याबाबत १४ वर्षीय पीडित मुलाने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दोन जानेवारी रोजी सायंकाळी हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा त्याच्या भावाच्या घरी निघाला होता. तो पायी चालत जात असताना येथील अशोका म्युज सोसायटीच्या पाठिमागील रस्त्यावर त्याला मेहंदी याने अडविले व चाकूचा धाकाने जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेले. त्याला लुल्लानगरमधील केंद्रीय महाविद्यालयाजवळ असणाऱ्या जंगलात नेले. त्याठिकाणी मेहंदी याने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. अधिक तपास सुरू आहे.