नाशिक : मुंबई आग्रा महामार्गांवर (Mumbai Agra) इगतपुरी जवळ कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. (Nashik Accident) या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. मुंबई-नाशिक महामार्गाच्या विल्होळी जवळील आठवा मैल चौफुलीच्या उतारावर पहाटे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
[read_also content=”उद्योजक अनिल अंबानींना इन्कम टॅक्सची नोटीस, 420 कोटी रुपयांचा कर चुकवल्याचा ठपका https://www.navarashtra.com/latest-news/income-tax-notice-to-anil-ambani-in-case-of-tax-evasion-of-rs-420-crore-nrps-319464.html”]
मुंबई आग्रा महामार्गांवर आठव्या मैल भागात आज पहाटे पवणेतीनच्या सुमाराला भरधाव थार आणि कंटेरनचा अपघात घडला. या अपघातात 5 जण गंभीर जखमी झाले. तर महिंद्रा थार या कारचा चालक जागीच ठार झाला. त्यांनी तातडीने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे पाच जणांचे प्राण थोडक्यात वाचलेत. मात्र या अपघातामध्ये महिंद्रा थार या कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय.
[read_also content=”कुटुंबियांचा संशय खरा ठरला! सोनाली फोगट यांच्या हत्ये प्रकरणी दोघांना अटक https://www.navarashtra.com/india/two-arresterd-in-sonali-phogat-murder-case-319482.html”]