राजापूरमध्ये व्यावसायिकाची फसवणूक (फोटो- istockphoto)
व्यावसायिकाला साडेदहा लाखांचा गंडा
राजापूर तालुक्यातील बाकाळेतील घटना
टाटा पिकअप ट्रक केला परस्पर हडप
राजापूर: राजापूर तालुक्यातील बाकाळे येथील एका व्यवसायिकाचा विश्वास संपादन करून, त्यांचा १० लाख ५० हजार रुपये किमतीचा टाटा पिकअप ट्रक परस्पर हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी मिरज (जि. सांगली) येथील एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला. फिर्यादी भुपाळ भिकाजी तारकर (वय ४२, रा. बाकाळे, ता. राजापूर) यांच्या मालकीचा ट्रक आरोपी परमेश्वर केशव जाधव (रा. गणेश तलाव, मिरज, जि. सांगली) याने विश्वासाने चालवण्यासाठी घेतला होता.
मात्र, फिर्यादी यांनी आपला ट्रक परत मागितला असता, आरोपीने तो देण्यास टाळाटाळ केली. आरोपी परमेश्वर जाधव याने ट्रक परत न करता, फिर्यादीचा विश्वासघात करून तो स्वतःच्या फायद्यासाठी वापरून अपहार केला. या ट्रकची एकूण किंमत सुमारे १० लाख ५० हजार रुपये इतकी आहे. ६ जानेवारी पासून हा प्रकार सुरू होता. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांत भाव घेतली. याप्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात ६ मार्च रोजी दुपारी २ वाजता आरोपी परमेश्वर जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. राजापूर पोलिस अधिक तपास करत आहेत.
मुंबईत सायबर गुन्हेगारांचा धुमाकूळ; डॉक्टर, ज्येष्ठ नागरिक आणि सरकारी अधिकारी टार्गेट
मुंबईत सायबर गुन्हेगारांचा धुमाकूळ
मुंबईमध्ये सायबर फसवणुकीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले असून, लोकांना फसवण्यासाठी सायबर गुन्हेगार नवनवीन पद्धती शोधून काढत आहेत. मुंबईत दाखल झालेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये सायबर गुन्हेगारांनी एक डॉक्टर, एक ज्येष्ठ नागरिक महिला आणि एका सरकारी अधिकारी अशा तिघांकडून ४.८९ लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगारांनी सोशल मीडियावर क्रिकेट सामन्याचे तिकीट विकणे, सीबीआय अधिकारी बनून पैसे रिफंडचे सांगत फसवणूक करणे आणि नकली कस्टमर केअर कॉल करणे अशा वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या आहेत. या तिन्ही प्रकरणातील पीडितांनी सायबर हेल्पलाइन १९३० तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिस मोबाइल नंबर, बँक अकाउंट आणि सोशल मीडिया डिटेल्सचा वापर करून आरोपींचा तपास करीत आहेत.
Pune Crime: पुणेमध्ये धक्कादायक प्रकार! सासरकडून छळ, गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचा पतीवर आरोप
अंधेरीतील एक ६६ वर्षीय महिलाही सायबर गुन्हेगारांची शिकार ठरली आहे. १ मार्च रोजी सकाळी त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्याने आपण सीबीआय आफिसर असल्याचे सांगितले. त्याने धमकी दिली की, जर त्यांनी त्वरित पैसे पाठवले नाहीत, तर त्यांना अटक केली जाईल. धमकीमुळे घाबरलेल्या महिलेने त्या दिवशी २०,००० ट्रान्स्फर केले. ४ मार्च रोजी आरोपीने पुन्हा फोन करून आणखी पैसे मागितले. भीतीने महिलेने पुन्हा वेगवेगळ्या वेळी २२ हजार, ५ हजार, ४६ हजार, १४ हजार आणि तीन हजार रुपये पाठवले. असे एकूण १०० लाख १० हजार रुपये त्यांनी त्या आरोपीला पाठवले.






