Photo Credit- Team Navrashtra तब्बल ११ वर्षांनंतर नरेंद्र मोदींना RSSच्या मुख्यालयाची आठवण; ३० मार्चला नागपूर दौऱा
नागपूर: नागपुरात झालेल्या हिंसाचाराला १५ दिवस उलटत नाही तोच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 30 मार्चला नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देणार आहे. या भेटीचे विशेष म्हणजे पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी अनेकदा नागपूर आणि परिसरातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावली, तसेच दीक्षाभूमीलाही भेट दिली. मात्र, संघ मुख्यालय किंवा रेशीमबाग येथील स्मृतीमंदिराला भेट दिली नव्हती. या वेळी माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त पंतप्रधान मोदी ३० मार्च रोजी स्मृतीमंदिराला भेट देणार आहेत. त्यामुळे ‘मोदींना पंतप्रधान झाल्यानंतर तब्बल ११ वर्षांनी संघाच्या भेटीची आठवण का झाली?’ अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजप आणि संघ यांचे अतूट नाते आहे. संघाच्या विचारधारेतून अनेक स्वयंसेवक पुढे भाजपमध्ये प्रवेश करीत राजकीय क्षेत्रात सक्रिय झाले. आजही भाजपच्या संघटन मंत्रिपदाची जबाबदारी संघाकडूनच दिली जाते. स्वतः नरेंद्र मोदी हे संघाचे जुने प्रचारक आहेत. मात्र, पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी विविध धार्मिक आणि सामाजिक संस्थांना भेटी दिल्या असल्या तरी नागपूरच्या संघ मुख्यालयापासून त्यांनी काहीसा दुरावा ठेवला होता.
Prashant Koratkar Attack: कोल्हापूर कोर्टात वकिलांचा प्रशांत कोरटकरवर हल्ला, न्यायालयात काय घडलं?
दरम्यान, दर तीन वर्षांनी संघाच्या नागपुरातील प्रतिनिधी सभेला गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहतात. विजयादशमी उत्सव आणि तृतीय वर्ष संघ शिक्षावर्गाचा समारोपीय कार्यक्रम हे संघाचे दोन प्रमुख वार्षिक कार्यक्रम आहेत, ज्यांना विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहतात. मात्र, पंतप्रधान झाल्यापासून मोदींनी या संघटनात्मक कार्यक्रमांना आणि संघ मुख्यालयाला दूर ठेवण्याची भूमिका घेतल्याचे दिसत होते. आता, ३० मार्च रोजी स्मृतीमंदिराला होणाऱ्या त्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
नागपूर आणि परिसरातील विविध कार्यक्रमांसाठी मोदी येत असताना, ते स्मृतीमंदिराला भेट देतील का? याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये अनेकदा चर्चा रंगली होती. दोन वर्षांपूर्वी त्यांनी दीक्षाभूमीलाही भेट दिली होती. मात्र, त्यांनी स्मृतीमंदिराला जाणे टाळले होते. अखेर ३० मार्च रोजी माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त मोदी स्मृतीमंदिराला भेट देणार असून, त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
पंढरपूरच्या आयुर्वेदाचार्याने लढवली अनोखी शक्कल; लाखोंच्या SUV ला शेणाचे लेपन, तब्बल ५० टक्क्यांनी
भाजप आणि संघ यांचे घनिष्ठ संबंध असून, संघाच्या विचारधारेतून तयार झालेल्या अनेक स्वयंसेवकांनी भाजपच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला आहे. नरेंद्र मोदी स्वतः संघाचे प्रचारक राहिले आहेत. मात्र, पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी संघाच्या नागपूर मुख्यालयाला जाणे टाळले होते. दरम्यान, दर तीन वर्षांनी संघाच्या नागपूरमध्ये होणाऱ्या प्रतिनिधी सभेला गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांसह अनेक नेते उपस्थित राहतात. विजयादशमी उत्सव आणि तृतीय वर्ष संघ शिक्षावर्गाच्या समारोपाला देखील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतात.मोदी यांच्या ३० मार्चच्या स्मृतीमंदिर भेटीमुळे, त्यांनी संघ मुख्यालयापासून दूर राहण्याचा निर्णय बदलला आहे का? याबाबत राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे.