महाविकास आघाडी एकसंघपणे लढणार; इचलकरंजी महानगरपालिकेत भक्कम पर्याय देणार (Photo : iStock)
शिक्रापूर : राज्याचे मिनी मंत्रालय समजली जाणारी जिल्हा परिषद व पंचायत समितीचा पंचवार्षिक कार्यकाळ संपून अनेक वर्ष पुढे जात आहेत. त्यात अद्याप जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होत नसून सदर निवडणुकांसाठी न्यायालयाच्या निकालासाठी वेगवेगळ्या तारीख दिल्या जात असल्याने जिल्हा परिषद निवडणुका लांबणीमुळे इच्छुकांची धाकधूक वाढू लागली.
हेदेखील वाचा : Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्येप्रकरणातील मुख्य सूत्रधार; आरोपपत्रात उल्लेख
राज्यातील अनेक जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती व ग्रामपंचायतचा कार्यकाळ काही वर्षांपूर्वी संपला असून, सदर स्थानिक स्वराज्य संस्थांवर सध्या प्रशासक आहे. त्यांच्या निवडणुका वेगवेगळ्या कारणाने पुढे ढकलल्या जात आहे. यापूर्वी सदर स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच अनेक इच्छुकांनी त्यांची मोर्चेबांधणी करत आपापल्या भागामध्ये महिलांचे देवदर्शन कार्यक्रम, विविध कार्यक्रम, विविध देणग्या, गावामध्ये विविध उपक्रम, विविध स्पर्धांना बक्षिसे देणे सुरु ठेवले असताना आपल्या भागातील दशक्रिया विधींना हजेरी तसेच युवकांच्या वाढदिवस व लग्नांना हजेरी लावून मतदारांना आपलेसे करण्याचे काम सुरु केलेले होते.
दोन-तीन वर्षांपासून अनेक इच्छुकांचे हे कार्य सुरु असल्याने लाखो रुपयांचा भुर्दंड त्यांना सोसावा लागलेला आहे. यापूर्वी लोकसभा व विधानसभा निवडणुका संपल्यानंतर लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे बोलले जात आहे. असे असताना विधानसभेच्या अनेक विजयी व पराभूतांनी स्थानिक स्वराज्य संस्थेवर आपली पकड ठेवण्याच्या उद्देशाने पावले उचलण्यास सुरुवात केली. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुढे ढकलली जाऊन फेब्रुवारी अखेर सुनावणी होणार आहे.
संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात जाणार तीन महिन्यांचा काळ
आता सुनावणी न्यायालयाने निवडणुकांची तारीख ठरवली तर संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात तीन महिन्यांचा काळ जाणार आहे. मात्र, त्यावेळी पावसाळा सुरु होण्याची चिन्हे निर्माण होणार हे निच्छित मात्र पावसाळ्यात निवडणुका न होता दिवाळीपर्यंत पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती व ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या इच्छुक उमेदवारांची धाकधूक चांगलीच वाढली आहे.
हेदेखील वाचा : Bhayandar: ‘जोडो मारो’ आंदोलनात मराठा बांधव आक्रमक; प्रशांत कोरटकरच्या बेताल वक्तव्याविरोधात संतापाची लाट