पुण्यातील जैन बोर्डिंगप्रकरणी स्टे कायम! अहिल्यानगरमधील जैन समाज झाला आक्रमक
पुणे येथील जैन समाजाच्या मंदिराचे बोगस खरेदीखत रद्दबातल करून संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सकल जैन समाजाने आज अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जैन समाज आक्रमक झाला.
पुणे येथील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट या सार्वजनिक विश्वस्त मंडळाने धर्मदाय आयुक्तांना खोटी माहिती देत विश्वस्त संस्थेची पुणे येथील मॉडेल कॉलनी परिसरातील तीन एकर जागा बेकायदेशीररित्या विकली. यामुळे देशातील जैन समाज क्रोधित आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, की बोगस व लबाडीने झालेले खरेदीखत रद्दबातल करण्यात यावे. देशाच्या इतिहासात प्रतिष्ठित जैन मंदिर विक्री झाले व गहाण टाकल्याने त्याचे पावित्र्य धोक्यात आणले आहे. या प्रकरणातीस दोषीवर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा. पोलिसांकडे तक्रार देऊनही अद्याप कारवाई इशाली नाही. विकसकाने बोर्डिंगची इमारत उध्वस्त केल्यास सर्व पुरावे नष्ट होण्याचा धोका आहे. तातडीने यथास्थिती राखण्यासाठी आपल्या विशेष अधिकाराद्वारे संबंधित बाब पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोच करावी, अशी मागणी करण्यात आली.
शरद पवारांना धक्का! ‘या’ बड्या नेत्यांचा अजित पवाराच्या राष्ट्रवादीत प्रवेश
पुण्यातील एच एन डी जैन बोर्डिंग संदर्भात “स्टे” कायम आहे. ३० ऑक्टोबर पर्यंत धर्मदाय आयुक्त यांच्याकडून “स्टे” कायम करण्यात आला आहे. “स्टे” दरम्यान जागेवर कुठला ही व्यवहार करता येणार नाही. ३० ऑक्टोबर रोजी राज्य धर्मदाय आयुक्त यांच्यासमोर पुन्हा सुनावणी होणार आहे.
कापड बाजारातील जैन मंदिर, दाळ मंडई, आडते बाजार, चरती चौकमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला, जैन समाजातर्फे प्रांताधिकारी सुधीर पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जैन समाजाचे नरेंद्र फिरोदिया, किशोर मुनीत, अनिल पोखरणा, शैलेश मुनोत, सीए अशोक पिलो, संजय चोपडा, सीए अजय मुषा तसेच माजी महापौर भगवान फुलसौंदर, संभाजी कदम् विक्रम राठोड आदी उपस्थित होते.
सस्थेच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट न करता उत्कृष्ट स्थितीतील इमारत चुकीच्या पद्धतीने मोडकळीस दाखविली. संस्थेच्या परिसरात ६५ वर्षे जुने १००८ श्री भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर आहे. त्याचे अस्तित्वथ डावलले, हा सरळ जैन धर्मावर घाला आहे. कोणतीही शहानिशा न करता राजकीय दबाव तंत्राचा वापर करीत विविध परवानगी, आदेश मिळवल्याचा आरोप करण्यात आला.
संस्थेच्या घटनेनुसार (ट्रस्ट डीड) विश्वस्त मंडळाला जागा विक्रीचा अधिकार नाही. संस्था चालविताना आर्थिक अडचणी आल्यास समाजाकडे दान मागणे यासह रक्कम उभारण्यास इतर पर्याय नमूद आहेत.
विश्वस्त मंडळाने व्यक्तिगत फायद्यासाठी संस्थेची जमीन विक्री करण्याचा पर्याय स्वीकारल्याने हे बेकायदेशीर असल्याचे निवेदनात महटले आहे.
मोर्चामध्ये सकल जैन समाज, जैन ओसवाल पंचायत, बडीसाजन श्री संघ, दिगंबर जैन समाज, श्री रुषभ संभव जैन श्वेतांबर संघ, श्वेतांबर जैन गुजराती समाज, अ. भा. जैन ओसवाल संस्था, श्री वर्धमान जैन श्रावक संघ, धार्मिक परीक्षा बोर्ड, जैन ओसवाल युवक संघ, बडीसाजन युवक संघ, जैन सोशल फेडरेशन, वर्धमान युवा संघ, धर्मचक्र युवक मंडळ, जय आनंद युवक फांऊडेशन, महावीर चषक परिवार, महावीर प्रतिष्ठान, जितो अहिल्यानगर, जय आनंद महावीर युवक मंडळ आदी संस्थांनी पुढाकार घेतला.






