द्राक्षहंगामात शेतकऱ्यांच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी आमदार रोहित पाटील सरसावले
राज्यातील कृषी केंद्र चालक आणि अवकाळी पावसाने त्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन आमदार रोहित पाटील यांनी आज मंत्रालयात थेट राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची आग्रही मागणी केली. दरम्यान, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या समस्यांची नोंद घेत तातडीने विभागीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
कृषी विभागाने सुरू केलेल्या ‘साथी पोर्टल 2’ च्या अनिवार्य वापरामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील कृषी केंद्र चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक केंद्रांवर संगणक, इंटरनेट आणि प्रिंटर यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने व्यवहारांची नोंद वेळेत करणे कठीण ठरत आहे.
Pune News : बालगंधर्व कलादालनाला प्रचंड प्रतिसाद; इतर कलादालनांकडे होतंय दुर्लक्ष?
आमदार पाटील यांनी कृषिमंत्र्यांना स्पष्ट केले की, सध्या सांगली जिल्ह्यात द्राक्षहंगाम सुरू आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना वारंवार औषध फवारणी करावी लागत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा अमूल्य वेळ पोर्टलवरील तांत्रिक प्रक्रियेमुळे वाया जाऊ नये, म्हणून ‘साथी पोर्टल’ची सक्ती तात्पुरती स्थगित करण्याची मागणी त्यांनी केली.
सदर निवेदनात त्यांनी ग्रामीण भागातील विक्रेत्यांना आवश्यक तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच जिल्हास्तरावर प्रशिक्षण व तांत्रिक सहाय्य केंद्रे सुरू करण्याची मागणीही केली.
या तातडीच्या आणि शेतकरीहिताच्या पुढाकाराबद्दल सांगली जिल्ह्यातील शेतकरी बांधव आणि कृषी केंद्र चालकांनी आमदार रोहित पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. त्यांच्या या ठाम भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत असून, शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष वेधण्याची ही वेळेवर घेतलेली पावले ठरत आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या या ठाम भूमिकेबद्दल सांगली जिल्ह्यातील शेतकरी व कृषी केंद्र चालकांनी आमदार पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.






