प्राध्यापक संघटना आक्रमक (फोटो- टीम नवराष्ट्र)
राज्यातील प्राध्यापक भरती आणि मानधन वाढीवरून संघटना आक्रमक
कंत्राटी प्राध्यापकांना ९० हजार रुपये मानधन देण्याची मागणी
प्राध्यापकांचे अन्नत्याग अंदोलन
पुणे: राज्यातील प्राध्यापक भरती आणि मानधन वाढीवरून संघटना आक्रमक झाली आहे. १०० टक्के प्राध्यापक भरती, तासिका तत्वावरील सीएचबी प्राध्यापकांना प्रति तास १ हजार ५०० रुपये आणि दरमहा ६० हजार रुपये मानधन द्यावे. तसेच कंत्राटी प्राध्यापकांना ९० हजार रुपये मानधन देण्यात यावे, शासनातर्फे ६ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला प्राध्यापक भरती संदर्भातील अध्यादेश नियमबाह्य असल्याने तो तात्काळ रद्द करावा, आदी मागण्यांसाठी हे बेमुदत आंदोलन महाराष्ट्र नव प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष संदीप पाथ्रीकर यांनी उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर सुरू केले आहे.
पाथ्रीकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील विविध विभागांमधील पात्रता धारक उमेदवार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. प्राध्यापक भरती हेच आमचं लक्ष हे आहे. यापूर्वीही संघटनेसह विविध प्राध्यापक संघटनांनी उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर आंदोलन केले होते यश न आल्यामुळे परत आम्ही याठिकानी आंदोलनाला बसलो आहोत.
संदीप पाथ्रीकर पुढे म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी १०० टक्के प्राध्यापक भरती करावी. मानधनात वाढ करावी, पदभरतीमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अमच्या मगण्या घेऊन याठिकानी आंदोलन बसलो आहेत.
Pune News: राज्यात नवीन GR नुसार प्राध्यापक भरती; पारदर्शकतेसह गुणवत्तेला प्राधान्य
प्राध्यापक पदभरती १००% आणि सीएचबी मानधनवाढ याबद्दल शासन पात्रताधारकांची फसवणूक करित असून, २ वर्षापासून प्राध्यापक पदभरतीची घोषणा करतायत परंतू प्रत्यक्षात कृती ० आहे. एनईपी-२०२० च्या नवीन अभ्यासक्रम संरचनेतील त्रुटी दूर करुन अध्यापन केल्या जाणाऱ्या सर्व विषयांचा कार्यभार निश्चितीत समावेश करावा.
-प्रा डॉ संदीप पाथ्रीकर, छत्रपती संभाजीनगर
अध्यक्ष महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटना
दि. १ ऑक्टोंबर २०१७ च्या आकृतीबंधातील मंजूर पदातील रिक्त असलेल्या सहाय्यक प्राध्यापक ग्रंथपाल शारीरिक शिक्षण संचालक प्रयोगशाळा सहाय्यक या पदांच्या भरतीला शंभर टक्के परवानगी देऊन मार्च २०२५ पर्यंत एकूण सर्व रिक्त पदे तात्काळ भरावीत. त्याचबरोबर तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या अध्यापकांना पंधराशे रुपये प्रमाणे ६० हजार रुपये मानधन देऊन वर्षातील ११ महिने साठी त्यांची नियुक्ती विना मुलाखती करण्यात यावी. ६ ऑक्टोंबरला निघालेल्या परिपत्रकामध्ये दुरुस्ती करावी.
-बाबासहेब खंडाळे प्राध्यापक
आंदोलनकर्त्या प्राध्यापकांनी उपस्थित केलेले सर्व मुद्दे धोरणात्मक बाबींशी संबंधित आहेत – प्रामुख्याने सीएचबी वेतनश्रेणीतील वाढ, प्राध्यापकांची भरती आणि ७५:२५ निवड निकष. या नवीन प्रणाली अंतर्गत, उमेदवाराच्या शैक्षणिक, अध्यापन आणि संशोधन (एटीआर) कामगिरीला ७५% महत्त्व दिले जाते, तर मुलाखतीत उर्वरित २५% महत्त्व दिले जाते. ते या धोरणात सुधारणा करण्याची मागणी करत आहेत. असोसिएशनने आज आम्हाला एक पत्र सादर केले, परंतु हे निर्णय माझ्या पातळीवर घेता येत नसल्याने मी ते ताबडतोब राज्य सरकारला पाठवणार आहे. राज्यपालांच्या सूचनेनुसार, आम्ही आधीच ७५:२५ निकषांमध्ये सुधारणा केली आहे. आवश्यक कारवाईसाठी, मी त्यांचे निवेदन सरकारला पाठवत आहे आणि मी त्यांना त्यांचे उपोषण त्वरित संपविण्याचे आवाहन देखील केले आहे.
– शैलेंद्र देवळांकर






