बच्चू कडूंचा 'ट्रॅक्टर मार्च' नागपुरात दाखल (Photo Credit - X)
Bacchu Kadu Protest: शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन आणखी तीव्र झाले आहे. हा ‘ट्रॅक्टर मार्च’ वर्धाहून निघून नागपूरजवळच्या बुटीबोरी येथे दाखल झाला असून, मोठ्या संख्येने शेतकरी ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे, ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
बच्चू कडू यांनी सरकारने घेतलेल्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सरकारवर थेट आरोप केला आहे की, बैठक बोलावून त्यांना अटक करण्याची योजना आखली जात आहे. कडू म्हणाले, “बैठकीची काय गरज आहे, थेट निर्णय घ्या.” आम्ही यापूर्वी दहा वेळा बैठकीची विनंती केली, पण सरकारने प्रतिसाद दिला नाही. आता मार्च सुरू झाल्यावर बैठक बोलावणे म्हणजे आंदोलन कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे. जर आम्ही बैठकीला गेलो आणि आम्हाला अटक झाली, तर आंदोलक निराधार राहतील. हा अन्याय असेल.” कडू यांनी स्पष्ट केले की, ते आता कोणत्याही सरकारी बैठकीत सहभागी होणार नाहीत आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्जमाफीवर त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
#WATCH | Nagpur, Maharashtra: Thousands of farmers led by Former minister and Prahar Party leader Bacchu Kadu block the Nagpur–Hyderabad National Highway (NH-44) They are demanding immediate, unconditional loan waivers for debt-ridden farmers. The protesters allege that despite… pic.twitter.com/HLSTtRbmRz — ANI (@ANI) October 28, 2025
सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने नागपूरमध्ये ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. नागपूरमधील धरमपेठ येथील मुख्यमंत्री निवासस्थान, सिव्हिल लाईन्स येथील सरकारी निवासस्थान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय या परिसरातील पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस आणि वाहतूक विभाग पूर्णपणे सज्ज आहेत.
पुण्यातील Pune Jain House Land प्रकरणात धर्मादाय आयुक्तांचा मोठा निर्णय; 30 ऑक्टोबर पर्यंत…
हा ‘ट्रॅक्टर मार्च’ वर्धाहून बुटीबोरी येथे पोहोचला आहे. यामध्ये हजारो ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि शेतकरी सहभागी झाले आहेत. आंदोलकांसाठी सोलापूरहून २०,००० भाकरी, मिरची आणि शेंगदाणा खरडा, नाशिकहून कांदे आणि भाज्या, लातूरहून तूर डाळ, तसेच इतर भागांतून हुरडा आणि धान्य नागपूरला पाठवण्यात आले आहे. यावरून संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र या आंदोलनासाठी तयार असल्याचे सांगितले जात आहे.
आंदोलकांनी सरकारला संध्याकाळी ५ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता, तो आता समाप्त झाला आहे. त्यामुळे आता आंदोलक नागपूर शहराकडे कूच करत आहेत.
शेतकऱ्यांचे प्रमुख आरोप:
Flood Relief: “येत्या 15 दिवसांमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना…”; काय म्हणाले CM देवेंद्र फडणवीस?






