मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या (BMC Election) दृष्टीने मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुबईच्या विकास योजनांच्या पूर्णत्वाकडे विशेष लक्ष दिले आहे.
आज भल्या सकाळीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि पर्यावरण मंत्री आदित्य मुंबईत एकाच गाडीतून प्रवास करत आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील विकास कामांची पाहणी केली. यावेळी अजित पवार यांच्या गाडीचे सारथ्य आदित्य ठाकरेंनी केले. तर कामांची पाहणी करताना आदित्य ठाकरेंचे कौतुक करत अजित पवारांनी त्यांच्या घड्याळ निशाणी प्रमाणे भल्या सकाळीच मुंबईतील अधिकाऱ्यांना सूचना करत आपल्या प्रशासकीय नजरेतून अनेक महत्वाच्या सूचना केल्या.
[read_also content=”Shocking! पॅराग्लायडिंग दरम्यान झाला घात, तो हवेत लटकत राहिला; व्हिडिओ पाहून तुम्हीही घाबरून जाल https://www.navarashtra.com/viral/man-hanging-on-to-paraglider-viral-video-will-shock-you-know-the-details-in-marathi-nrvb-236414.html”]
पुण्यात किंवा मुंबईत असले तरी अजित पवारांचा दिवस भल्या सकाळी सहा वाजता सुरू होतो. ते नेहमीच सकाळच्या वेळेत विकासकामांचा आढावा घेत असतात. यावेळी नाईट लाईफचा आग्रह असलेल्या अदित्य ठाकरे यांच्या सोबत अजित दादांनी पहिल्यांदाच भल्या सकाळी मुंबईत महालक्ष्मी रेड क्रॉस, वरळी, धोबी तलाव याठिकाणी जाऊन विकास कामांची पाहणी केली. यावेळी दोन्ही नेत्यांचे सोबत फिरतानाचे छायाचित्र समूह माध्यमांवर भाव खावून जात आहेत. यावेळी काही सूचक पोजवर नेटकरी व्यक्त झाले आहेत.
मुंबई महापालिकेने गेल्या वर्षी हेरिटेज वॉकची सुरुवात केली होती. तेव्हासुद्धा अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले होते. ‘पुढे चला मुंबई’ अशी घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली आहे. मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्या दौऱ्याने चर्चा सुरू झाल्या आहेत. एकीकडे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याचे मुहूर्त सांगणा-या भाजप नेत्यांना अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्या एकत्रित विकासकामांची पाहणी दौऱ्याने भल्या सकाळच्या त्या शपथविधीनंतर पुन्हा एकदा भल्या सकाळी नवे राजकीय समिकरण दिसल्याचे मानले जात आहे.
[read_also content=”ठप्प झाली एअरटेलची सेवा; युजर्स भडकले, वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांची झाली पंचाईत https://www.navarashtra.com/technology/airtel-4g-wifi-network-down-airtel-internet-users-faces-major-outage-across-india-nrvb-236494.html”]
यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारामतीत एका कार्यक्रमासाठी आले असताना अजित पवार यांनी कारचे सारथ्य केले होते. तेव्हा आमच्या सरकारचे स्टेअरिंग अजित पवार यांच्याकडे असल्याचे उद्धव ठाकरे मिश्किलपणे म्हटले होते. मात्र आता आघाडी सरकारचे स्टेअरिंग ठाकरेंच्या नव्या पिढीकडे गेल्यास त्यालाही अजित पवारांचा विरोध नसेल असा संदेश राजकीय वर्तुळात गेल्याचे बोलले जात आहे.