अकोला : सिटी कोतवाली पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर लोहा बाजारात रंगपंचमीला जुगार सुरू होता. ही माहिती मिळताच पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी छापा टाकून १७ अरोपींना अटक केली. त्यांच्या जवळून १७ मोबाइल, १३ मोटरसायकल व नगदी असा ९ लाख ८४ हजार ९६० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
[read_also content=”१३ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया रोखली, तक्रारीनंतर उच्च न्यायालयाचे जिल्हा परिषदेला निर्देश https://www.navarashtra.com/latest-news/vidarbha/gondia/tender-process-of-rs-13-crore-blocked-high-court-directs-zilla-parishad-after-complaint-nraa-257182.html”]
लोहा बाजार येथील बंद गोडाऊनमध्ये सुरू असलेल्या जुगार अड़यावर विशेष पथकाने छापा मारून १७ जुगा-यांना अटक केली. जुगा-यांकडून १५,००० रुपये, १३ मोटरसायकल,१६ मोबाइल असा एकूण ९ लाख ८४ हजार ९६० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी रूपेश खत्री, विक्रम ठाकुर, बिरज जोशी, अमित त्रिवेदी, उज्जवल जाधव, पंकज अग्रवाल, ऋषिकेश पांडे, राहुल बगाडी, प्रणीत बोरडे, वत्सल रूपारेल, विनीत जोशी, अक्षय नलवाया, विपुल जैन, नीरज उपाध्याय, दीपक शर्मा, धीरज हड़किनी व निखिल अग्रवाल सर्वांना अकोला यांना ताब्यात घेतले.