रांजणगावात वडापावच्या दुकानातून लपून-छपून सुरु होती दारुची विक्री; पोलिसांना माहिती मिळताच... (Liquor Racket)
शिक्रापूर : रांजणगाव गणपती (ता.शिरुर) येथील हॉटेल युनिक पॅलेसजवळ एका वडापावच्या दुकानात एक व्यक्ती बेकायदेशीपणे दारुची विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना मिळाली. त्यानंतर पोलीस हवालदार विलास आंबेकर, संदीप जगदाळे, पोलीस शिपाई किशोर शिवणकर यांनी सदर वडापावच्या दुकानात जाऊन वडापाव घेण्याचा बहाणा करत छापा टाकला.
हेदेखील वाचा : Pune CP Press : नराधम दत्ता गाडेचा आत्महत्येचा प्रयत्न; गळ्यावर दोरीच्या खुणा असल्याची पुणे पोलीस आयुक्तांची माहिती
वडापाव घेण्याचा बहाणा करत त्यांना पांडुरंग शिंदे ही व्यक्ती बेकायादेशीपणे दारुच्या बाटल्यांची विक्री करताना मिळून आली. दरम्यान, पोलिसांनी दारुसाठ्यासह सदर इसमाला ताब्यात घेतले. याबाबत पोलीस हवालदार संदीप सुरेश जगदाळे (रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.
दरम्यान, पोलिसांनी या फिर्यादीवरून पांडुरंग बाबुराव शिंदे (वय ३६ वर्षे रा. दत्त मंदिर जवळ रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार वैभव मोरे हे करत आहे.
हातभट्टीची गाडी पकडून २८० लिटर दारू पकडली
पुण्याच्या बाहेर अवैधरित्या हातभट्टीसारखी दारू तयार करून त्याची विक्री मात्र शहरात होत असल्याचे दिसत आहे. पुणे- सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर पोलिसांनी शहरात येत असणारी हातभट्टीची गाडी पकडून २८० लिटर दारू पकडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी वाहतूक करणारा मुबारक जाफर गड्डे (वय 43) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हजारो लिटर दारु जप्त
गेल्या काही दिवसाखाली लोणी काळभोर परिसरातील रामदारा येथे असलेल्या गावठी दारू बनविणार्या हातभट्टीवर गुन्हे शाखेने छापा कारवाई केली. पोलिसांनी छापा कारवाईत दीड हजार लिटर तयार दारू, २० हजार लिटर रसायन व दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य असा ११ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, मध्यरात्री कारवाई झाल्याने अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पसार झाला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मुकेश कर्णावत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
हेदेखील वाचा : मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा कट? मुंबई पोलिसांना मिळाली धमकी