यवतमाळ : घरगुती हिंसाचाराच्या अनेक घटना समोर येत असतात. अशातच प्राणघातक हल्ले घडतात. अशीच एक घटना यवतमाळ येथे घडली आहे. मद्यप्राशन करून असलेल्या पतीने विवाहितेसोबत वाद उपस्थित करून तुझ्या आईने मला वास्तुपूजना करीत का बोलवले नाही, असे म्हणून स्टीलच्या वस्तूने डोक्यावर मारून गंभीर जखमी केले. एवढेच नव्हे तर जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. ही घटना २० मे रोजी इंदिरा नगर भागातील यवतमाळ येथे घडली.
नितु राजु चवरे (३० वर्ष ) रा. इंदीरा नगर यवतमाळ असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. घटनेनंतर तिने अवधूत वाडी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी पती राजु प्रकाश चवरे ( ३५ वर्ष ) रा. इंदीरा नगर यवतमाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.