40 महिषासुरांचं मर्दन कर असे साकडे आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या टेंभी नाक्याच्या सुप्रसिद्ध देवीला घातले. काल ठाण्यातील नवरात्रौत्सव मंडळांना दानवे यांनी भेट देत देवींचे दर्शन घेतले. यावेळी शिवसैनिकांमध्ये मोठया प्रमाणात उत्साह पाहायला मिळाला. सर्वांनी फटाक्यांच्या जल्लोषात दानवे यांच स्वागत केलं.
ठाणे येथील शिवसेना चंदनवाडी शाखा, नवज्योत मित्र मंडळ रामचंद्र नगर नं. २, जय भवानी जय अंबे सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, रामचंद्र नगर नं. १ , जिजामाता नगर येथील देवींचे दर्शन घेतले.
यावेळी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहर प्रमुख प्रदिप शिंदे,सुरेश मोहिते, विभागप्रमुख प्रशांत सातपुते, उपविभागप्रमुख अरुण खेतले, शिवसेना शाखाप्रमुख अमोल हिंगे व शिवसेना पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.






