अंबरनाथ तहसील कार्यालयात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन
अंबरनाथ तहसील कार्यालयात रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवामध्ये शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने पिकवलेल्या आणि पावसाळ्यातील औषधी व गुणकारी रानभाज्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. या महोत्सवात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. अंबरनाथ तालुका कृषी विभाग आत्मा उमेदवार यांच्या संयुक्त विद्यमानाने अंबरनाथ तहसील कार्यालयात हा रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवाला अंबरनाथ नव नियुक्त तहसीलदार अमित पुरी आणि कल्याणचे उप विभागीय कृषी अधिकारी सुधीर नाइरवाड यांनी उपस्थिती लावली होती. तहसीलदार अमित पुरी यांच्या हस्ते सकाळी रानभाजा महोत्सवाच उद्घाटन करण्यात आलं.
हेदेखील वाचा- 30 रुपये रिक्षाच्या भाड्यावरून झाला वाद, मित्रच मित्राला भिडला; भयंकर शेवट
अंबरनाथ तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या रानभाज्या महोत्सवात मोठ्या संख्येने शेतकरी दाखल झाले आहेत. या महोत्सवात शेतकऱ्यांनी औषधी आणि गुणकारी रानभाज्या विक्रीसाठी आणल्या होत्या. यामध्ये आघाडा, शेवळा, कुलोजी भाजी, भारंग, मायाळू, कपाळ फोडी, दिंडा भाजी, करटोळी, टाकळा अशा विविध प्रकारच्या रानभाज्यांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील महिला आणि शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने अंबरनाथ तहसील कार्यालयात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
याबाबत अंबरनाथ नव नियुक्त तहसीलदार अमित पुरी यांनी सांगितलं की, आज अंबरनाथ तहसील कार्यालयात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या महोत्सवात आघाडा, शेवळा, कुलोजी भाजी, भारंग, मायाळू, कपाळ फोडी, दिंडा भाजी, करटोळी, टाकळा अशा विविध प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. तर ग्रामीण भागातील शेतकरी आणि आदिवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक ते प्रयत्न करून असे वेगवेगळे उपक्रम राबविले जातील.
हेदेखील वाचा- विदर्भात आज जोरदार पावसाची शक्यता! चंद्रपूर, गोंदियाला हवामान विभागाचा यलो अलर्ट
कल्याणचे उप विभागीय कृषी अधिकारी सुधीर नाइरवाड यांनी सांगितलं की, संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये ऑगस्ट महिन्यात तालुका कृषी अंबरनाथ आणि उमेद संस्थेमार्फत रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात येतो. ग्रामीण भागातील महिला आणि शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा त्याबरोबरच पावसाळ्यात उगवणाऱ्या रानभाज्यांचा प्रचार होऊन शेतकऱ्यांना बाजार प्लेट उपलब्ध व्हावी यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. या महोत्सवाच्या माध्यमातून लोकांना रानभाजांचे महत्त्व कळावं आणि या भाज्यांमधील औषधी गुणकारी महत्त्व नागरिकांना कळावं यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने पिकवलेल्या आणि पावसाळ्यातील औषधी, गुणकारी रानभाज्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.