दीप्ती शर्माने रचला इतिहास, ठरली पहिली महिला खेळाडू (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
IND Vs ZIM : नाद करायचा नाय! झिम्बाब्वेला लोळवत भारताची मालिकेत २-० अशी विजयी आघाडी
इतकेच नाही, तर या शतकासह दीप्ती शर्माने भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकर आणि मनोज प्रभाकर यांच्या एलिट क्लबमध्येही प्रवेश केला. खरे तर, एकदिवसीय सामन्यांमध्ये १५० पेक्षा जास्त बळी आणि किमान दोन शतके झळकावणारी दीप्ती ही पुरुष आणि महिला मिळून केवळ तिसरी भारतीय खेळाडू ठरली आहे.
सचिनच्या नावावर एकदिवसीय सामन्यांमध्ये १५४ बळी आणि ४९ शतके आहेत. दुसरीकडे, मनोज प्रभाकरच्या नावावर एकदिवसीय सामन्यांमध्ये १५७ बळी आणि दोन शतके आहेत. दीप्तीच्या नावावर आता दोन शतकांसह १७१ एकदिवसीय बळी आहेत.
झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारतीय महिला संघाने १२१ धावांनी विजय मिळवला. दीप्ती शर्मा व्यतिरिक्त, माजी कर्णधार हरमनप्रीत कौरनेही १२६ धावांची शानदार खेळी केली. हरमनप्रीतने या खेळीत १२६ चेंडूंचा सामना करत एकूण १५ चौकार मारले. दीप्ती आणि हरमनप्रीतच्या या शतकांमुळे भारतीय महिला संघाने निर्धारित ५० षटकांत ६ गडी गमावून ३२८ धावा केल्या.
प्रत्युत्तरात, झिम्बाब्वेने भारताला कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला, परंतु आघाडीच्या फलंदाजांची फलंदाजी अयशस्वी ठरल्याने संपूर्ण संघ कोसळला. संपूर्ण झिम्बाब्वे संघ ४८.५ षटकांत २०७ धावांवर सर्वबाद झाला. दरम्यान, भारतीय संघासाठी गोलंदाजी विभागात वैष्णवी शर्माने उत्कृष्ट कामगिरी केली. तिने १० षटकांत ३९ धावा देऊन ४ बळी घेतले. दीप्ती शर्माने 3 तर सायली सातघरे, जिंतीमणी कलिता आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
Harmanpreet Kaur चा मैदानात राडा! कर्णधारपद सोडल्यानंतर ठोकलं खणखणीत शतक; मिताली राजचा विक्रम मोडला
Ans: दीप्ती शर्माने ६ क्रमांकावर शतक करण्याचा रेकॉर्ड केला आहे
Ans: दीप्तीने आपल्या खेळीत १५ चौकारांसह ८६ चेंडूंमध्ये नाबाद १०६ धावा केल्या
Ans: दीप्ती सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे






