मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे सध्या शंभर कोटी प्रकरणात आर्थर रोड जेलमध्ये (Jail) शिक्षा भोगत आहेत, पण त्यांना आज अचानक चक्कर आल्याने तुरुंगात पडले. त्यामुळं त्यांना तात्काळ मुंबईतील जे. जे. रुग्णालयात (JJ Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या आधी सुद्धा त्यांना तुरुंगात छातीत दुखत होते, त्यावेळी त्यांना परळच्या केईएम रुग्णालयाच्या (KEM Hospital) आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबवीर सिंग यांनी लेटरबॉम्ब टाकत थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहत अनिल देशमुख हे पैसे गोळा करण्यास सांगतात, अशी तक्रार केली होती. त्यानंतर देशमुख्यांना राजीनामा द्यावा लागला होता. देशमुखांना ईडीने कारवाई केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. कारागृहातच चक्कर येऊन पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार आज सकाळी 11 वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सध्या प्रकृतीबाबत वृत्त समोर आले नाही.