Photo Credit- Social media
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूरनंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळुज एमआयडीसी परिसरात हिट अँड रनची भयंकर घटना आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी विशाल उर्फ उद्धव ज्ञानेश्वर चव्हाण (वय 22 वर्ष) आणि कृष्णा कारभारी केरे (वय 19 वर्ष) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; पुण्यात कायदा सुव्यवस्था राहिली आहे की नाही?
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (13 सप्टेंबर) रात्रीच्या सुमारास विशाल आणि कृष्णा दारु पिऊन स्कॉर्पिओ चालवत होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळुज एमआयडीसी परिसरात पोहचताच स्कॉर्पिओने कारला जोराची धडक दिली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघेजण गंभीर जखमी झाले. स्कॉर्पिओची कारला धडक बसल्याचा आवाज येताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. तर पोलिसांनी स्कॉर्पिओ चालक विशाल आणि कृष्णाला ताब्यात घेतले.
हेही वाचा: मुंबईतील खाद्य संस्कृतीचे दर्शन करण्यासाठी ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या
या दुर्घटनेत कारमधील चारजणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंंभीर जखमी झाले. कारमधील कुटुंबातील सदस्य एक कार्यक्रम आटोपून घरी निघालेहोते. पण रस्त्यात ही घटना घडली. तर वाहन चालवण्याचा परवाना नसताना आणि दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या विशाल आणि कृष्णावर संभाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात मृणालिनी अजय बेसरकर (38), आशालता हरिहर पोपळघट (65), अमोघ बेसरकर (सहा महिने), दुर्गा सागर गीते (7) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अजय अंबादास बेसरकर (40), शुभांगिनी सागर गीते (35) या जखमी झाल्या आहेत.