पुणे : ससून रुग्णालयातून वैद्यकीय अधीक्षक आणि डॉक्टरांचे शिक्के चोरुन बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करणाऱ्या एकास अटक करण्यात आली. ससून रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांनी पाळत ठेऊन आरोपीला पकडले. आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. शैलेश शिवशंकर दामशेट्टी (वय २६, रा.रास्ता पेठ) यांनी याबाबत बंडागर्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी प्रकाश पांडुरंग मोंडकर (रा.कणकवली, सिंधुदूर्ग) याला अटक करण्यात आली आहे. त्याचा साथीदार सत्पाल पवार (रा.कराड, सातारा) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.