आशिये - वागदे प्रस्तावित पूल आचरा बायपासला ठरणार दुवा, नेमकं प्रकरण काय ?
कणकवली/ भगवान लोके : कणकवली शहरातून आचऱ्याला जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून आचरा बायपास अस्तित्वात येत आहे. मात्र,कणकवलीत सुरुवातीलाच पोस्ट ऑफिसची जागा असल्याने केंद्र शासन स्तरावर हा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे पर्यायी मार्ग निर्माण करण्यासाठी आशिये येथून वागदे येथील गणपती मंदिर येथे गडनदीवर पूल उभारण्याची मागणी नागरिक,वाहनचालकांची आहे . सदर पूल उभारण्याच्या जागेची पाहणी वागदे येथे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी केली आहे. आचरा बायपासला वाहनासाठी पर्यायी रस्ता देण्यासाठी आशिये वागदे जोडणारा पूल प्रस्तावित करण्यात येत आहे.
यावेळी आशिये सरपंच महेश गुरव,वागदे सरपंच संदीप सावंत, भाजपा उपाध्यक्ष सोनू सावंत,वागदे माजी सरपंच भाई काणेकर,लक्ष्मण घाडीगावकर,उपसरपंच संदीप जाधव,सत्यवान धुरी, प्रवीण पावसकर ,सचिन गुरव,सत्यवान गुरव आदींसह आशिये ग्रामस्थ उपस्थित होते.
मुंबई गोवा महामार्गाला जोडणारा वागदे आशिये पूल व्हावा, यासाठी मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सरपंच महेश गुरव यांनी भेट घेतली होती.कारण हा गडनदीवरील पूल ३० ते ३५ गावांना जोडणारा आहे.वरवडे, आशिये ,कलमठ,पिसेकमते, बिडवाडी यासह कणकवली आणि मालवण तालुक्यातील ३० ते ३५ गावांना थेट या पर्यायी मार्गामुळे मुंबई गोवा महामार्गावर येता येणार आहे .कणकवली शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी अवजड वाहनांना देखील या मार्गाने पर्याय देता येईल, त्यामुळे त्यावेळी कार्यकारी अभियंता संबंधित पूल करण्यासंदर्भात श्री. सर्वगोड यांना सूचना करण्यात आल्या होत्या. लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कालावधी हे कामकाज थांबले होते .आता पुन्हा एकदा आचरा बायपासला जोडणारा हा महत्त्वपूर्ण पुलाचा रस्ता व पूल करण्याचे नियोजन आशिये सरपंच महेश गुरव यांच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना व वाहन चालकांना हा सोयीचा पर्यायी रस्ता ठरणार आहे.
या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाचा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी केली पाहणी केली आहे. पूल झाल्यास कणकवली तालुक्यातील ३० ते ३५ गावांना याचा फायदा होणाार आहे, असं स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या पुलाच्या निमित्ताने स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी मिळण्यास मदत होऊ शकते. तसंच गावगावाला जोडणाऱ्या पुलामुळे वाहतूकीचा नवा मार्ग तयार होत असल्याने गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे.