देहूरोड :देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील विविध प्रलंबित प्रश्न आणि रखडली विकासकामे मार्गी लावण्यासह राज्य सरकारकडून देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डला देय असलेला जीएसटीचा हिस्सा लवकरात लवकर देण्याची मागणी देहूरोड शहर भाजपच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
पालकमंत्री पाटील यांचे सोमाटणे फाटा येथील इंद्रायणी हॉटेल येथे शेलारवाडीतील शेलार परिवार आणि भाजपच्यावतीने स्वागत करण्यात आले. या वेळी भाजपच्या शिष्टमंडळाने देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील प्रलंबित विकासकामे आणि नागरी प्रश्न सोडविण्याबाबत पालकमंत्री पाटील यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये राज्य सरकारकडून देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डला देय असलेला जीएसटीचा हिस्सा लवकरात मिळावा. शेलारवाडीतील स्वामी विवेकानंद शाळेच्या नवीन इमारत बांधकामासाठी निधी द्यावा. माजी मंत्री बाळा भेगडे यांनी सिद्धिविनायनगरी, दत्तनगर, श्री विहार या भागासाठी ५ कोटी ४९ लाख रुपये खर्चाची पाणी योजना मंजूर केली होती. त्या योजनेची नव्याने टेंडर प्रक्रिया राबवावी. राज्य व केंद्र सरकारच्या सर्व योजना देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाला देखील लागू कराव्यात, आदी मागण्यानिवेदनात करण्यात आल्या.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे, जिल्हा किसान संघाचे माजी अध्यक्ष शंकरराव शेलार, भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार, माजी शहराध्यक्ष उद्धव शेलार, गजानन शेलार, विश्वनाथ शेलार, अनंत चंद्रचूड, विलास शिंदे, धर्मेंद्र प्रसाद, प्रफुल्ल शेलार, मयूर शेलार, आदिनाथ शेलार, महेश शेलार आदी उपस्थित होते. या वेळी शेलार परिवाराच्यावतीने पालकमंत्री पाटील यांचा सत्कार करण्यात आला
[blockquote content=” देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील रखडलेली विकासकामे मार्गी लावण्याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबाबत सकारत्मक चर्चा झाली. यासाठी मंत्रालयात लवकरच बैठक घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. ” pic=”” name=”-रघुवीर शेलार, माजी उपाध्यक्ष, देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड.”]