जालन्यात व्हायरल व्हिडिओमुळे तणाव (फोटो- istockphoto)
Jalna Violence: महाराष्ट्राच्या जालना शहरात तणाव वाढला आहे. जालन्यात एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शहरात एक तणाव वाढला आहे. एक व्यक्ती एका व्हिडिओत गाईची कत्तल करत असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती गाईची कत्तल करताना दिसून येत आहे. त्यामुळे जालन्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान हा व्हिडिओ निर्माण झाल्यावर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने आवश्यक पावले उचलली आहेत. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल होताच सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
जालना शहरात एका व्यक्तीने गाईची कत्तल करत असतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केला. त्यानंतर सकल हिंदू समाजात तीव्र प्रतिसाद उमटले. तसेच हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या अस्लम कुरेशी याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची केली आहे. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. त्यातच असा व्हिडिओ समोर आल्याने जातीय तेढ निर्माण करून समाजात अनुचित प्रकार घडावा यासाठी असे प्रकार केले जात असल्याचा आरोप या घटनेवर केला जात आहे.
आरोपींवर कारवाई होणार?
जालन्यात गायीची कत्तल करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान त्यानंतर सकल हिंदू समाज आक्रमक झाला आहे. आरोपीविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे. तर पोलिसांनी कायदेशीर तरतुदी पाहून कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे.
टेस्ट ट्यूब ‘मधून गायींची गर्भधारणा
वंध्यत्वावर उपचार म्हणून कायमच ‘टेस्ट ट्यूब बेबी’ या वैज्ञानिक पद्धतीकडे बघितल्या गेले. पण हेच संशोधन झपाट्याने नष्ट होणा-या भारतीय गायींच्या प्रजाती वाचविण्यासाठी फायदेशीर ठरते आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील प्रजनन शास्त्राच्या प्रयोगशाळेने टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यामातून पाच वर्षांत 114 गायींना जन्म दिला आहे. आजच्या घडीला येथील 88 गायी गाभण आहेत. तसंच अत्याधुनिक संशोधनातून गायींच्या गभर्धारणेचा टक्काही 11.40 वरून 32.12 वर पोहचला आहे.
Test Tube Cow : ‘टेस्ट ट्यूब ‘मधून गायींची गर्भधारणा, 5 वर्षांत तब्बल 190 गायींचा जन्म
पशु विज्ञान क्षेत्रातील संशोधनाचा फायदा नष्ट होत जाणा-या भारतीय गायींच्या प्रजाती वाचविण्यासाठी व्हावा यासाठी केंद्र सरकारने डिसेंबर 2020 मध्ये राष्ट्रीय गोकुल मिशन जाहीर केले. या अंतर्गत माफसू विद्यापीठात 2021 मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा सुरू झाली. माफसुचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रा. डॉ. मनोज पाटील यांच्यावर प्रजनन प्रयोग शाळेची धुरा सोपविण्यात आली. आज येथे डॉ. डी. एस. रघुवंशी, डॉ. ए. पी. गावंडे, डॉ. एम. एस. बावस्कर, डॉ. एस. ए. इंगळे आणि डॉ. ए. एम. शेंडे यांचे योगदान आहे.