लोकशाहीचा खून! EVM वरून पुकारलेले आत्मक्लेश आंदोलन मागे; उद्धव ठाकरेंच्या हस्ते सोडले बाबा आढावांनी उपोषण
पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी EVM वरुन पुकारलेले आत्मक्लेश आंदोलन अखेर मागे घेतले आहे. उद्धव ठाकरेंच्या हस्ते पाणी पिऊन त्यांनी हे उपोषण मागे घेतले. बाबा आढाव यांची खरी ओळख निर्माण झाली ती रिक्षावाल्यांच्या आंदोलनापासून, त्यांनी संपूर्ण हयात कष्टकरी समाजाला न्याय मिळवून देण्याच्या लढ्यात गेली. हमाल, रिक्षावाले, मजूर यांच्या चुली पेटाव्यात म्हणून ते लढले. यंदाच्या निवडणुकीत महायुतीला भरभरून मतदान झाले अगदी 100 टक्के जागा निवडून आल्या त्याही भरघोस मतांनी हाच मुद्दा महाविकास आघाडीसह अनेक नागरिकांना पडला आहे. यामध्ये EVMचा गैरवापर झाला आहे, असे वाटत असल्याने सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी असं काय लोकसभा निवडणुकीनंतर घडले जे महायुतीला एवढे मतदान पडले. यामध्ये बाबा आढाव यांनी EVM वरून आत्मक्लेश आंदोलन पुकारले होते, ते आज आंदोलन त्यांनी मागे घेतले. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पिऊन त्यांनी उपोषण सोडले.
यंदाच्या निवडणुकीत जाणीवपूर्वक योजनांचा भडिमार
नुकतेच विधान सभेचा निवडणूक पार पडली. त्यानंतर निकाल लागल्यानंतर अनेक निकाल धक्कादायक होते. यंदाच्या निवडणुकीत महायुतीला भरघोस मतदान मिळाले. यंदाच्या निवडणुकीत झालेला पैशांचा गैरवापर, महिलांना मिळालेला अनेकानेक योजनांद्वारे मतदारांना दिलेला पैसा मोठा धोकादायक असल्याचे सांगत हा लोकशाहीचा खून असल्याचे सांगितले. यंदाची निवडणूक खरोखरच वेगळी आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी लोकशाहीसाठी पुकारलेले आत्मक्लेश आंदोलन अखेर मागे घेतले आहे. विधान सभेच्या निवडणूक निकालानंतर बाबा आढाव यांनी यंदाच्या निवडणुकीत अदानी फॅक्टर चालल्याचे सांगत या निवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाल्याचे सांगितले. बाबा आढाव यांची ज्येष्ठ नेते शरद पवारसुद्धा यानी भेट घेतली. त्यानंतर अजित पवारसुद्धा भेटीला आले. यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीसुद्धा बाबा आढाव यांची भेट घेतली.
अनेक पक्षांच्या मनात EVM वरून संशय
विधानसभा निवडणुकांचा जो निकाल लागलाय तो कुणालाच मान्य नाही.देशभरातून त्याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. 76 लाख मते वाढली कशी. कुठून आली ही 76 लाख मते. पाच वाजल्यापासून साडेअकरा वाजेपर्यंत ही मते कशी आणि कुठून आली. हरयाणातही अशीही मते वाढली होती. महाराष्ट्रातही पाचनंतर 76 लाख मते वाढली. याचा हिशोब लागत नाहीये. हीच 76 लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार आहेत. 76 लाख मते कुठून आली. नाना पटोले यांनी जो प्रश्न उपस्थित केला. तोच आमचाही प्रश्न आहे.’ असा प्रश्न ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
एवढी मते कुठून आली
संजय राऊत म्हणाले, ‘रात्री साडेअकरा वाजेपर्यंत कुठे मतदान सुरू होतं. साडेअकरा वाजेपर्यंत कोण मतदान करवून घेत होत. हरयाणात 14 लाख मते वाढली तिथे तिथे भाजपचा विजय झाला. महाराष्ट्रात 75 लाख मते वाढली इथेही महायुतीचा विजय झाला. हा विजय खरा नाही. बाबा आाढाव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलन उभारले आहे. आता महाराष्ट्रही हळूहळू त्यांच्यात सहभागी होईल. या राज्यातली लोकशाही, समाजव्यवस्था धोक्यात आहे. या देशातील निवडणूक यंत्रणा भ्रष्ट झाली आहे. पुण्यात बाबा आढाव गेल्या दोन दिवसांपासून आत्मक्लेश आंदोलन करत आहेत. शरद पवारांनी आज त्यांची भेट घेतली. दिल्लीतील लोकही त्यांची भेट घेणार आहेत. पण हे चित्र गंभीर आहे, महाराष्ट्रासाठी हे गंभीर आहे.
हेही वाचा : Sanjay Raut on EVM: ‘ती 76 लाख मते कुठून आली…?’ संजय राऊतांचा थेट सवाल






