बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर पक्ष कारवाई करू शकते अशी चर्चा सुरू होती, इतक्यात त्यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन हा वाद सुरू झाला होता. ज्यामध्ये बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. बाळासाहेब थोरात यांनी दिलेला राजीनामा म्हणजे कॉंग्रेस पक्षासाठी मोठा धक्का आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबेंनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर काँग्रेसने तांबे पिता पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली.