Photo Credit- Social Media
मुंबई: राज्य विधानसभा निवडणुकांना काही दिवस शिल्लक राहिले असताना राज्यातील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. राजकीय पक्षांकडे इच्छुकांचा रांगा लागल्या आहेत, राजकीय पक्षांचे दौरे, सभा, बैठका, मेळावे सुरू आहेत. राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. अशातच बारामतीत लागलेल्य बॅनर्सने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या बॅनर्सवर सुप्रिया सुळे या भावी मुख्यमंत्री तर युगेंद्र पवार फिक्स आमदार म्हणून बॅनर लागलेआहेत. या बॅनर्समुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
बारामतीतील गुणवडी चौकात फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीने हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर ‘सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार’अशायाचा मजकूर असलेला बॅनर लावण्यात आला आहे. ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त हे बॅनर लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकीसाठीही राज्यातील जनतेचे लक्ष बारामतीकडे लागले आहे. त्यामुळेच बारामतीत लागलेले पोस्टर्सची सध्या चर्चा रंगली आहे.
हेही वाचा: कर्नाटक सरकारचा महिलांसाठी ऐतिहासिक निर्णय; ‘त्या’कठीण दिवसांत मिळणार पगारी सुट्टी
महायुती आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण?
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पुर्वतयारीने राजकीय वातावरण तापू लागले आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यावरही जोरदार चर्चा रंगली आहे. आपल्याच पक्षातील नेता मुख्यमंत्री व्हावा,अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे महायुतीत एकनाथ शिंदे, देंवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी चर्चाआहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे, नाना पटोले, जंयत पाटील, सुप्रिया सुळे यांच्याही नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
पण या चर्चा सुरू असताना जर सर्वांत शांत कोणी असेल तर शरद पवार. राज्यातील सहा प्रमुख राजकीय पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ सुरू असली तरी शरद पवार यांनी मात्र अद्याप आपल्याकडून कोणाचेही नाव प्रसिद्ध केलेले नाही. किंबहुना मुख्यमंत्रीपदाबाबत त्यांनी अद्याप कोणतीही ठोस भूमिका मांडलेली नाही.आधी महायुतीची सत्ता घालवून आणि मगच मुख्यमंत्री ठरवू, अशी भूमिका त्यांनी घेतलेली दिसते.
हेही वाचा: कसा असेल राष्ट्रवादीचा तिकीटवाटपाचा ‘फॉर्म्युला’? शरद पवारांनी सगळंच सांगितलं
पण विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला तर शरदपवार यांच्याकडून सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश आमदार हे पहिल्यांदाच आमदार होणार आहेत. त्यामुळए सुप्रिया सुळेंना अशा आमदारांचे समर्थही मिळू शकते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांचा दबदबा होता. पण आता तशी स्थिती नाही, सुप्रिया सुळे यांच्यासाठी मार्ग मोकळा आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीतील इतर ज्येष्ठ नेते जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाडहेदेखी शरद पवार यांच्या निर्णयाला विरोध करतील, असे दिसत नाही.त्यामुळे सध्या तरी सुप्रिया सुळेंच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.