रणजीत कासलेच्या पोलिस कोठडीत वाढ (फोटो- सोशल मिडिया)
बीड: बीड जिल्हा सध्या अनेक कारणामुळे चर्चेचे केंद्र बनला आहे. सरपंच संतोष देशमुख Sanoths Deshmukh हत्या प्रकरणात बडतर्फ पोलिस अधिकारी रणजीत कासलेने Ranjit kasle अनेक दावे आणि आरोप करून खळबळ उडवून दिली होती. रणजीत कासलेला बीड सत्र न्यायालयाने २३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
रणजित कासलेला बीड पोलिसांनी पुण्याच्या स्वारगेट भागातून अटक केली होती. रणजीत कासले यांच्या विरुद्ध ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कोर्टाने कासलेला २३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आज बडतर्फ अधिकारी रणजीत कासलेला बीड कोर्टात हजर करण्यात आले. यावलेस पोलिसांनी त्याच्या १० दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. मात्र कोर्टाने २ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
मोबाइलमधील डेटा रिकव्हर करणे, त्याने वापरलेले वाहन ताब्यात घेणे गरजेचे असल्याने पोलिसांनी १० दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र बीड कोर्टाने २३ एप्रिलपर्यन्त कोठडी सुनावली आहे.
मोठी बातमी! निलंबित PSI रणजीत कासलेला दणका; कोर्टाने सुनावली ‘इतक्या’ दिवसांची कोठडी
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर रणजित कासलेने काही धक्कादायक आणि खळबळजनक दावे केले होते. विशेष म्हणजे, या प्रकरणाशी संबंधित आरोपी वाल्मिक कराड याचे एन्काऊंटर करण्याची ऑफर आपल्याला दिली गेली होती, असा गंभीर आरोप कासलेने केला होता. या खुलाशामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
रणजित कासले याने काही दिवसांपूर्वी राज्यातील वरिष्ठ नेते धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. त्यानुसार, संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याचे एन्काऊंटर करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्याची ऑफर त्याला देण्यात आली होती, असा धक्कादायक खुलासा कासले याने केला होता. या आरोपांमुळे राजकीय आणि पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर?
“अक्षय शिंदे प्रकरणात पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करावेत आणि एसआयटीची स्थापना करावी,” अशा बातम्या मी टीव्हीवर पाहिल्या. मात्र, माझ्या मते फक्त एसआयटी स्थापन करून काहीही निष्पन्न होणार नाही. जर खरोखरच सत्य बाहेर आणायचं असेल, तर केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील एसआयटी नेमली गेली पाहिजे.
Ranjit Kasale: अकाऊंटला १० लाख अन् इव्हीएममध्ये छेडछाड; कासलेंचे पुन्हा धक्कादायक खुलासे
कासलेंचे पुन्हा धक्कादायक खुलासे
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दोन-तीन दिवस आधी माझ्या अकाऊंटवर १० लाख रुपये जमा करण्यात आले होते. मला ईव्हीएम मशीनपासून दूर राहण्यासाठी मला हे पैसे देण्यात आले होते. परळीतील राखेच्या सेंटर परिसरात आमची राहण्याची सोय करण्यात आली होती. त्याठिकाणी वाल्मिक कराड मला स्वत:भेटायला आले होते. लोकसभा निवडणुकीवेळी मी बोगस मतदान करू दिले नव्हते, त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील परळीच्या मतदानावेळी मला इव्हीएम मशीन आणि मतदान कक्षापासून दूर राहण्यासाठी हे १० लाख रुपये माझ्या अकाऊंटवर पाठवण्यात आले होते, असा दावा निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केला आहे. पण त्यांच्या या दाव्यांमुळे आता परळीतील आणखी एक प्रकरण उजेडात आले आहे.