निलंबित पीएसआय रणजीत कासलेला पोलिस कोठडी (फोटो- सोशल मिडिया)
बीड: निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याला आज पहाटे अटक करण्यात आली.बीड पोलिसांनी ही कारवाई करत कासले याला पुण्यातील स्वारगेट भागातून ताब्यात घेतले. दरम्यान त्यानंतर पोलिसांनी रणजीत कासले याला कोर्टात हजर केले. पोलिसांनी त्याच्या ११ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. कोर्टाने कासलेला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
रणजीत कासले यांच्या विरुद्ध ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रणजीत कासले पुण्यात दाखल झाले होते. त्यांनी यावेळेस अनेक द्यावे व गौप्यस्फोट केले आहेत. याआधी देखील त्यांनी अशाच प्रकारची वक्तव्ये केली आहेत. दरम्यान बीड पोलिसांनी त्यांना पुण्यातून अटक केली. त्यानंतर आज त्यांना बीडमध्ये कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यावर कोर्टाने रणजीत कासलेला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
रणजित कासले याने काही दिवसांपूर्वी राज्यातील वरिष्ठ नेते धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. त्यानुसार, संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याचे एन्काऊंटर करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्याची ऑफर त्याला देण्यात आली होती, असा धक्कादायक खुलासा कासले याने केला होता. या आरोपांमुळे राजकीय आणि पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, कालच तो दिल्लीहून पुण्यात दाखल आला होता. त्यानंतर स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमध्ये त्याचा मुक्काम असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली. आज पहाटे अंदाजे चारच्या सुमारास बीड पोलिसांनी कारवाई करत कासलेला ताब्यात घेतलं.या कारवाईपूर्वी रणजित कासलेने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आपण लवकरच पोलिसांसमोर शरण जाणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात तो पोलिसांसमोर हजर होण्यापूर्वीच बीड पोलिसांनी पुण्यातून त्याला अटक केली.
Pune News: पुण्यात रणजित कासलेला बीड पोलिसांकडून अटक
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर रणजित कासलेने काही धक्कादायक आणि खळबळजनक दावे केले होते. विशेष म्हणजे, या प्रकरणाशी संबंधित आरोपी वाल्मिक कराड याचे एन्काऊंटर करण्याची ऑफर आपल्याला दिली गेली होती, असा गंभीर आरोप कासलेने केला होता. या खुलाशामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर?
“अक्षय शिंदे प्रकरणात पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करावेत आणि एसआयटीची स्थापना करावी,” अशा बातम्या मी टीव्हीवर पाहिल्या. मात्र, माझ्या मते फक्त एसआयटी स्थापन करून काहीही निष्पन्न होणार नाही. जर खरोखरच सत्य बाहेर आणायचं असेल, तर केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील एसआयटी नेमली गेली पाहिजे.