संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार घोषित (फोटो सौजन्य-X)
Santosh Deshmukh Case News in Marathi : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे या आरोपींना 14 दिवसांच न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र, देशमुख यांच्या हत्येच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेला मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांना सापडला नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर नागरिकांकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
अशातच आता बीड पोलिसांनी आरोपी कृष्णा आंधळेला वॉन्टेड घोषित केलं असून शिवाय आरोपी आंधळेची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी बक्षीस देखील जाहीर केलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जवळपास सर्व आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. मात्र हत्येच्या दिवसापासून कृष्णा आंधळे हा एकमेक आरोपी फरार असून त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं नाही. पोलिसांनी त्याबद्दल माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर केले आहे. तर दुसरीकडे आज वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. खंडणी प्रकरणी ही कोठडी कोर्टाने सुनावली आहे. तर कराडच्या वरिलांनी त्याला स्लीपअॅप्नियासाठी सी पॅप मशीन देण्यासाठी कोर्टाकडे विनंती अर्ज केला आहे
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला खंडणी मागितल्याची घटना कारणीभूत आहे. या खंडणीचा आणि देशमुख यांच्या हत्येचा थेट संबंध आहे. हत्या प्रकरणातील आरोपीच्या फोनवरुन वाल्मिक कराडने आवादाला खंडणी मागितल्याचा आरोप आहे.
दरम्यान वाल्मिक कराडला मकोकामध्ये वाल्मिक कराडला याआधी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती. आज ती पोलीस कोठडी संपली होती. आरोपीचे वकील अशोक कवडे कोर्टात हजर होते. तर सरकारकडून सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे कोर्टामध्ये हजर होते. तपास अधिकारी किरण पाटील यांनी तपासाची माहिती दिली. या प्रकरणात तपास पूर्ण झाल्याची पाटलांनी माहिती दिली. पोलीस कोठडीची गरज नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार 5 फेब्रुवारीपर्यंत आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. सध्या कराड बीड पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये आहे. बीड जिल्हा कारागृहात कराडची रवानगी होण्याची शक्यता आहे.






