मुख्यमंत्र्यांच्या वाहन ताफ्यातील कारचा अपघात
आज (दिं. 13 ऑगस्ट) मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत जळगावात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने भव्य मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव विमानतळावर पोहचल्यानंतर तिथून मेळाव्याच्या ठिकाणी जात होते. यादरम्यान त्यांच्या ताफ्यातील वाहने एकमेकांना आदळली आणि अपघात झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मेळाव्यासाठी जळगाव विमानतळावर पोहचले तिथून ते मेळाव्याच्या ठिकाणी जात होते. त्यावेळी त्यांच्या वाहनाच्या ताफ्यातील चार वाहनं एकमेकांवर आदळली. जळगाव विमानतळ परिसरामध्ये हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीत हानी किंवा गंभीर जखमी झालेलं नाही. ताफ्यातील चार वाहने एकमेकांवर आदळल्याने त्या वाहनांचे मोठं नुकसान झाले आहे. या अपघातानंतर काही वेळामध्ये मुख्यमंत्र्यांचा ताफा सभेच्या ठिकाणी रवाना झाला. ताफ्यातील इतर वाहनांमधून मुख्यमंत्री शिंदे सभास्थळी दाखल झाले.
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचाही संवाद
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांअतर्गत जळगावमध्ये लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने मोठ्या मेळाव्याचे आयोजन केले गेले. लाडकी बहीण योजनेच्या संभाव्य लाभार्थी महिलांशी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील उपस्थित राहिले. या मेळाव्याकरिता जिल्हा प्रशासनाने सुमारे 1 कोटी 9 लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली होती अशी माहिती मिळाली आहे.
या नेत्यांचाही संवाद
या मेळाव्यामध्ये महिलांसोबत संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री आणि युवक कल्याण आणि क्रीडा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, आयुष केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, कृषीमंत्री दादा भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील तसेच राज्यमंत्री अदिती तटकरे, अब्दुल सत्तार, विजयकुमार गावित यांनी उपस्थिती लावली होती.