नाशिक : राज्यात (Maharashtra Politics) नवीन राजकीय समीकरणांची (Political Equations) चर्चा सुरू असतानाच भविष्यात अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपाबराेबर (In BJP) जाण्याचा निर्णय घेतला तर आम्ही त्यांच्यासाेबत जाऊ असे म्हणत सिन्नरचे आमदार माणिकराव काेकाटे (Sinnar MLA Manikrao Kokate) यांनी खळबळ उडवून दिली आहे.
गेल्या दाेन दविसांपासून राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप हाेणार असल्याची भविष्यवाण वर्तविली जात आहे. त्यातच अजित पवार दाेन दविस नाॅट रिचेबल झाले हाेते. त्यावर त्यांनी स्पष्टीकरणही दिले, मात्र आता हळूहळू पडद्यामागे सुरू असलेल्या हालचाली समाेर येऊ लागल्या आहेत. यावर बाेलताना आमदार माणिकराव काेकाटे म्हणाले की, अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडले तर राष्ट्रवादीत उरणार तरी काय? असा प्रश्न त्यांनी उपसि्थत केला. सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अशा काेणत्याही चर्चा नाहीत. ज्या काही चर्चा आहेत त्या माध्यमांमध्ये सुरू आहेत. जाेपर्यंत अजित पवार यावर स्पष्ट भूिमका मांडत नाहीत; ताेपर्यंत आम्हीही अधिकृत काहीही बाेेलणार नाही, असेही ते म्हणाले.
[read_also content=”वीवो इंडिया 2023 मध्ये 1 दशलक्ष स्मार्टफोन निर्यात करेल https://www.navarashtra.com/technology/vivo-india-to-export-1-million-smartphones-in-2023-nrvb-386494.html”]
ते पुढे म्हणाले की, मराठीत एक म्हण आहे सत्तेशविाय शहाणपण नाही, त्यामुळे सत्तेत राहिलाे तरच विकासकामे हाेतात. मतदारसंघात विकासकामे करावयाची असतील तर सत्तेत राहिले पािहजे. अजित पवारांनी भाजपाबराेबर जाऊन सत्तेत सहभागी हाेण्याचा निर्णय घेतला तर ताे आमच्या मतदारसंघाच्या हिताचा असणार आहे. त्यामुळे आम्ही अजित पवारांबराेबरच राहू, असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी यावेळी बाेलताना केले.
उद्धव ठाकरेंबाबत आम्हालाही सहानुभूती आहे; मात्र राजकारण हे वस्तुस्थितीवर आधारित असते. त्यामुळे सद्यस्थितीत तरी सत्तेत राहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे अजित पवारांनी जर भाजपाबराेबर जाण्याचा निर्णय घेतला तर ताे विकासासाठी याेग्यच असणार आहे. त्यांनी असा निर्णय घेतला तर आम्ही त्यांच्याबराेबरच राहणार, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : १७ एप्रिल २०२३, कसा जाईल आजचा दिवस वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-17-april-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]