कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (NCP MLA) व माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर मागील महिन्यात आयकर विभाग तसेच ईडीने (ED) छापेमारीची कारवाई केली होती. त्यात आता माजी खासदार व भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुश्रीफ यांच्यावर वेगवेगळे घोटाळ्यांचे आरोप केले आहेत. त्यांनी जर बँकेकडून काही चुका झाल्या तर त्या आरबीआयकडून दुरुस्त केल्या जातील. हसन मुश्रीफ आणि परिवार, कंपन्यांवर धाडी टाकल्या होत्या. सध्या वेगवेगळ्या दिशेने तपास जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
कोल्हापुरात आलेल्या किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘बँकेची नव्हे तर मुश्रीफ यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाशी आणि मित्रपरिवारशी संबंधित आर्थिक व्यवहाराची ही चौकशी सुरु आहे. केडीसी बँक मजबूत राहणार आहे. ठेवीदाराची रक्कम सुरक्षित राहणार आहे. एका व्यक्तीने घोटाळा केला आणि त्याची चौकशी लागली तर ती बँकेची चौकशी नव्हे, त्या व्यक्ती संबंधित आहे. जर बँकेकडून काही चुका झाल्या तर त्या आरबीआयकडून दुरुस्त केल्या जातील. हसन मुश्रीफ आणि परिवार, कंपन्यांवर धाडी टाकल्या होत्या. सध्या वेगवेगळ्या दिशेने तपास जात आहे.
चौकशी बँकेची नव्हे तर…
बँकेची नव्हे तर मुश्रीफ यांच्या आणि त्याच्या कुटुंबाशी आणि मित्रपरिवारशी संबधित आर्थिक व्यवहाराची ही चौकशी सुरु आहे. शेतकऱ्यांना पुढे करून जर दंगा केला जात असेल तर चौकशी थांबत नाही. बँकेने कर्जदारांची टॉप 25 नावे जाहीर करावीत, ऑडिटरची पण चौकशी सुरू आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदावरुन हसन मुश्रीफ यांची ताबडतोब हकालपट्टी करावी. हसन मुश्रीफ यांनी अध्यक्ष असताना आपल्या कंपन्यांना दिलेले कर्ज लॉंग टर्म केले. त्यामुळे त्यांनी पदाचा दुरुपयोग केला आहे.
मी म्हणजे केडीसी बँक असं मुश्रीफ वागत आहेत : समरजित सिंह घाटगे
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी म्हटले की, ‘मी म्हणजे केडीसी बँक असे हसन मुश्रीफ वागत आहेत. संताजी घोरपडे कारखान्याचे नाव बदलून मुश्रीफ कंपनी करा. मुश्रीफ कुटुंबीय कंपनीने भ्रष्टाचार केला. जिल्हा बँकेतून कर्ज घेतले नाही म्हणणाऱ्या मुश्रीफांनी 233 कोटींचे कर्ज घेतले. बेकायदेशीर कर्जाची मुदत वाढवून चेअरमनपदाचा गैरवापर केला. पुढील 48 तासांत आणखीन एक मोठा खुलासा आम्ही करणार आहोत. सात वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात एक रुपयाचं कर्ज घेतलेलं नाही म्हणणाऱ्या मुश्रीफांनी जिल्हा बँकेचे नाव बदनाम केलं नाही का?, असा सवालही भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी केला आहे.