भाजप पंढरपूरमध्ये काय निर्णय घेणार (फोटो- ट्विटर)
विद्यामान आमदार तालुक्यातील गावात भेटी देत असून विविध विकास कामांचे भूमिपूजन करताना दिसत आहे. परिचारक देखील गावभेट दौऱ्यात व्यस्त आहेत. विविध कार्यक्रम आयोजित करीत आहेत. अनिल सावंत यांनी स्वःताह प्रचार यंत्रणा राबवली असून, गावोगावी जात अनेक कार्यक्रमांना ते हजेरी लावताना दिसत आहेत. तसेच तालुक्यात अनेक कार्यक्रम ते घेत आहेत. यामुळे पंढरपूर- मंगळवेढा विधान सभेची निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार असल्याचे जाणकार सांगतात.