फोटो - सुप्रिया सुळे व चित्रा वाघ
मुंबई: महायुती सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार राज्य सरकार जमा करणार आहे. दरम्यान कालपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरूवात झाली आहे. मात्र या विरोधकांनी ही योजना विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून आणली असल्याचा आरोप केला. आता महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महिलांनी बँकेतून पटकन पैसे काढून घ्यावेत असे म्हणत सरकारला डिवचले आहे. यावरून भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्र वाघ यांनी सुळेंवर निशाणा साधला आहे.
महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी होण्यास सुरूवात झाली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येपासून महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरूवात झाली आहे. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला डिवचले आहे. महिलांनी लगेचच आपल्या खात्यातून पैसे काढून घ्यावेत. सत्ताधारी पक्षातील लोक पैसे परत घेण्याबद्दल बोलत आहेत,. त्यामुळे या सरकारचे काही सांगता येत नाही असे म्हणत सुप्रिया सुळेंनी सरकारला डिवचले आहे. याला भाजप नेत्या चित्र वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
सुप्रिया सुळेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्र वाघ म्हणाल्या, ”महायुती सरकारने जाहीर केल्याप्रमाणे लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे बारामतीच्या मोठ्या ताईंच्या पोटात दुखू लागले आहे. स्वतः काही करायचे नाही आणि दुसऱ्यांनी केलेले त्यांना पाहवत नाही. मोठ्या ताई तुम्ही आयुष्यभर बोटंच मोडत बसा. या योजनेचा महाबिगाडीच्या नेत्यांनी अपप्रचार सुरू केला आहे. खरेतर या योजनेचे खुल्यादिलाने स्वागत करायला हवे होते. मात्र त्यांनी आपली विकृत मनोवृत्ती दाखवून दिली. ”
इकडे पैसे जमा होत आहेत आणि तिकडे बारामतीच्या मोठ्या ताईंना पोटशूळ उठलाय…!@supriya_sule @NCPspeaks #माझीलाडकीबहीण #FakeNarrative @Dev_Fadnavis @byadavbjp @AshwiniVaishnaw @cbawankule @ShelarAshish @BJP4India @BJP4Maharashtra @BJPMahilaMorcha @BJPMM4Maha @BJP4Mumbai pic.twitter.com/pLncB83cUa
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 15, 2024
पुढे चित्रा वाघ म्हणाल्या, ”पक्षात असलेला एखादा आमदाराने गमतीत असे विधान केले तर तर त्याचे भांडवल करण्याचा प्रयत्न यांनी सुरू केला आहे. महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा होऊ लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आपल्या वाचनाला पक्के आहेत. हे त्यांनी वचनपूर्ती करत दाखवून दिले आहे. अपप्रचार करणाऱ्या या मोठ्या ताईंपासून आणि बाकी विरोधकांपासून सावध राहा.”