रिलस्टार सुरेंद्र पाटील बलात्कार प्रकरणात नवीन वळण
रिलस्टार सुरेंद्र पाटील याच्य विरोधात बलात्काराचा गुन्हा मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आलेली आहे. मात्र ज्या तरुणीने माझ्या भावाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्या तरुणीने माझ्या भावाच्या कार्यालयातून सोन्याची अंगठी आणि चैन चोरी केली होती. ही घटना सीसीटीव्हीत कैद आहे. चोरी केलेली अंगठी आणि चैन माझ्या भावाने परत मागितली तेव्हा त्या तरुणीने मला ३० लाख रुपये दे अन्यथा तुझ्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करेन असे धमकावून माझ्या भावाच्या विरोधात बलात्काराचा खाेट्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसानी या प्रकरणी माझ्या भावाला न्याय द्यावा अशी मागणी रिल स्टार सुरेंद्र पाटील यांचे भाऊ पद्माकर पाटील यांनी केली आहे.
रिल स्टार सुरेंद्र पाटील याच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील पिडीत तरुणीने पाेलिस ठाण्यात तक्रार दिली की, रिलस्टार सुरेंद्र पाटील याने तरुणीला एअर होस्टेसची नोकरी लावतो असे आमिष दाखविले होते. नोकरी देण्याचे आमिष दाखवून सुरेंद्र पाटील याने तिच्यावर बलात्कार केला.हाेता.
तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे मानपाडा पोलिसांनी रिलस्टार सुरेंद्र पाटील याच्या विरोधात बलात्कार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर सुरेंद्र पाटील हा पसार झाला होता. त्याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने नाशिक येथून अटक केली.
सुरेंद्र पाटील बलात्कार प्रकरणात त्याचा भाऊ पद्माकर पाटील याने एक नवीन खुलासा केला आहे की, ज्या तरुणीने माझ्या भावाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्या तरुणीने माझ्या भावाच्या कार्यालयातून सोन्याची अंगठी व चैन चोरी केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद आहे. माझ्या भावाने अंगठी आणि चैन पुन्हा परत मागितली तेव्हा तिने मला ३० लाख रुपये दे अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करेन असे धमकाविले. माझ्या भावाने तिला ३० लाख रुपये दिले नाही म्हणून तिने माझ्या भावाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. माझ्या भावाला पोलिसांकडून न्याय मिळावा अशी मागणी पद्माकर पाटील यांनी केली आहे.