प्रतीकात्मक फोटो(फोटो-सोशल मीडिया)
सोनाजी गाढवे/पुणे : महाराष्ट्रातील शिक्षक भरती प्रक्रिया ही आशिया खंडातील सर्वांत अनोखी आणि विसंगत प्रक्रिया ठरली आहे. इथे प्रथम परीक्षांचे आयोजन केले जाते, निकाल जाहीर होतो, आणि त्यानंतरच जाहिरात प्रसिद्ध होते. पण निकाल लागुन आजूणही पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनची झाली नाही. शासनाचे आश्वासनावर आश्वासन चालू आहेत. भरतीची प्रतीक्रीया आणि शिक्षक भरती प्रक्रियेतील अन्याय संपणार तरी कधी? नाही तर शिक्षक अभियोग्यता धारक आणि विद्यार्थ्यी संघटनानी आंदोलन करु संगीतले लवकरात लवकर शासनानी ठोस निर्णाय घ्यावा.
आज घडीला २०२५ ची अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी पार पडून पाच महिने झाले आहेत, आणि निकाल लागून तीन महिने उलटून गेले आहेत. तरीही शिक्षक भरतीची जाहिरात अद्याप प्रसिद्ध झालेली नाही, तसेच नोंदणी प्रक्रिया, संचमान्यता व बिंदू नामावली यांसारख्या मूलभूत टप्प्यांवर शासन अत्यंत संथ गतीने काम करत आहे. ही केवळ महाराष्ट्रातील ढिलाई नाही हा लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी आणि बेरोजगार गुणवत्तापूर्ण युवकांच्या भविष्याशी खेळ आहे. गुणवत्तेच्या आधारे परीक्षा देऊन पात्र ठरलेले उमेदवार रस्त्यावर आंदोलन करायला भाग पाडले जात आहेत. हेच या व्यवस्थेचं अपयश आहे. आशी युवा विद्यार्थी असोसिएशन, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तुषार देशमुख यांनी चिंता व्याक्त केली.
हेही वाचा : ICC Ranking मध्ये मोठा उलटफेर! विश्वचषक जिंकूनही स्मृती मानधनाला मोठा झटका; लॉरा वोल्वार्ड्ट अव्वल स्थानी
कंत्राट पद्धतीने होणारी शिक्षक भरती पूर्णपणे रद्द करा आणि पात्रता धारक टेट पास अभियोग्यता धाराकांना शिक्षक म्हणून नियुक्त करावे. महाराष्ट्रात अभियोग्यता धारक नौकरी साठी गुणवत्ता सिद्ध करून ही त्यांना नियुक्ती मिळत नाही आणि शासन भरतीस विलंब करत असल्यामुळे अभियोग्यता धारकांचे वय उलटून चालले आहे. त्या मुळे त्यांची मानसिक स्तिथी ढासाळत चालली आहे त्या बद्दल शासनाने त्वरित जास्त जागांची शिक्षक भरती करणे गरजेचे आहे. असे लशिश चव्हान अभियोग्यता धारक यांनी संगीतले.
पवित्र पोर्टल शिक्षक भरती मध्ये होणारी दिरंगाई ही विद्यार्थ्यांच्या आयुष्य उध्वस्त होण्यास कारणीभूत ठरत आहे.वेळेवर भरती न होणे तसेच भरती ही वर्षानुवर्षे रेंगाळत राहणे. त्यामुळे वय वाढ आणि उमेदीचे वय वाया जाणे. इत्यादी गोष्टी घडत आहेत त्यामुळे शासनाने होणारी आगामी शिक्षक भरती ही लवकरात लवकर करावी आणि महाराष्ट्रातील तमाम डीएड बीएड अभियोग्यताधारकांना न्याय द्यावा -शेख अब्दुल गणी अभियोग्यता धारक विद्यार्थ्यीं महाराष्ट्रातील ढिलाई नाही हा लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी आणि बेरोजगार गुणवत्तापूर्ण युवकांच्या भविष्याशी खेळ आहे. गुणवत्तेच्या आधारे परीक्षा देऊन पात्र ठरलेले उमेदवार रस्त्यावर आंदोलन करायला भाग पाडले जात आहेत. हेच या व्यवस्थेचं अपयश आहे. शिक्षक भरतीसारख्या संवेदनशील प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेळेचं पालन अत्यावश्यक आहे. परंतु शासनाच्या ढिसाळ धोरणांमुळे आता तीव्र स्वरूपाचं, सामान्य जनतेच्या सहभागातून उभारलेलं जनआंदोलन अपरिहार्य झालं आहे. -तुषार देशमुख अध्यक्ष, युवा विद्यार्थी असोसिएशन, महाराष्ट्र राज्य कोणतीही स्पर्धा परीक्षा घेण्याअगोदर किती जागा रिक्त आहेत, किती भरल्या जाणार आहे याचा तपशील दिला जातो. शिक्षक भरती अशी आहे जी परीक्षा होऊन रिझल्ट लागला तरी जागे संदर्भात कोणतीही ठोस माहिती सांगितली जात नाही. कंत्राटी शिक्षक किंवा सेवानिवृत्त शिक्षकऐवजी टेट २०२५ ची भरती पवित्र पोर्टल द्वारे लवकरात लवकर करावी. समूह शाळा मुळे खेड्यातील विद्यार्थी शिकण्यापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ते रद्द करावे. -पूजा लोंढे शिक्षक अभियोग्यता धारक परीक्षा होऊन सहा महिने होत आहेत तरीही पवित्र पोर्टलवर नोंदणी किंवा शिक्षकांच्या जाहिरातीचा पत्ता नाही. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजाणी करताना ७५ हजार कंत्राट शिक्षकाऐवजी कायम शिक्षकांची भरती करण्यासाठी, मूलभूत हक्काची पायमल्ली होणारी समूह शाळा योजना बंद, आश्रम शाळा, समाजकल्याण शाळेवर पवित्र पोर्टलवर भरती केली जावी ते एक बिंदू एक पदभरती करून प्रतीक्षा यादी लावण्याबाबत हिवाळी अधिवेशनात हजारोच्या संख्येने तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. -कांबळे संदीप अध्यक्ष युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र येत्या हिवाळी अधिवेशनत आम्ही अभियोग्यता धारक जास्तीत जास्त संख्येने नागपूर येथे मोठे आंदोलन पुकारत आहोत व शासनास पवित्र पोर्टल द्वारे ७५ हजार शिक्षक भरती २०२५ मध्ये करण्यात यावी या करिता आग्रहाची भूमिका आमची असणार आहे, कारण महाराष्ट्र मध्ये ७५ हाजार कंत्राट शिक्षक कार्य करत आहे ज्यांची गुणवत्ता सुद्धा नाही आहे. -लशिश चव्हान अभियोग्यता धारक हेही वाचा : Women’s ODI World Cup : पंतप्रधान मोदींकडून भारतीय महिला संघाला जेवणाचे आमंत्रण! सर्व खेळाडू दिल्लीच्या दिशेने रवाना






