• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Changes In Teacher Recruitment In Marathi

शिक्षक भरतीच्या नियमात बदल! याचे परिणाम काय? आधीच्या तरतुदी कोणत्या?

राज्यातील शिक्षक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक व प्रभावी करण्यासाठी शासनाने नियमांत महत्त्वाचे बदल केले आहेत. ‘पवित्र पोर्टल’द्वारे होणाऱ्या भरतीत पदे रिक्त राहू नयेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 05, 2026 | 10:48 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, वेगवान आणि प्रभावी करण्यासाठी शासनाने शिक्षक भरतीच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. ही भरती प्रक्रिया ‘पवित्र पोर्टल’ या केंद्रिकृत ऑनलाइन प्रणालीद्वारे राबवली जाते. मात्र, आतापर्यंत उमेदवारांकडून प्राधान्यक्रम नोंदवूनही अनेक जागांवर उमेदवार उपस्थित न राहणे, नियुक्ती न स्वीकारणे किंवा पदे रिक्त राहणे असे प्रकार सातत्याने समोर येत होते. त्यामुळे ही अडचण दूर करण्यासाठी नव्या नियमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. नव्या नियमांनुसार, उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी शिक्षण संस्थांतील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांसाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देऊ शकतील. प्रवर्ग आणि विषय लक्षात घेऊन उपलब्ध असलेल्या सर्व रिक्त जागांसाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, उमेदवाराला त्याच्या सोयीनुसार कमाल ५० प्राधान्यक्रमच नोंदवता येतील, ही मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी (मुलाखतीसह व मुलाखतीशिवाय) स्वतंत्र असेल.

परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती; आदिवासी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जाचे आवाहन

वयाच्या अटींबाबतही बदल करण्यात आला आहे. पूर्वी जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकास उमेदवाराचे वय विचारात घेतले जात होते. आता अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराचे वय ग्राह्य धरले जाईल.

शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेबाबत आरटीई २००९ आणि १३ फेब्रुवारी २०१३ च्या शासन निर्णयानुसारच नियम लागू राहतील. सेमी इंग्रजी शाळांसाठी किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्रातील पदविकाधारक असणे बंधनकारक करण्यात आले आहे. पहिली ते पाचवी या गटासाठी सेमी इंग्रजी विषय शिकविण्यासाठी इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक अर्हता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. मात्र, त्या प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास, नव्याने जाहिरात देऊन १२ वी विज्ञान, बीए/एमए इंग्रजी किंवा बीएस्सी/एमएस्सी पात्रता असलेल्या उमेदवारांना संधी देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

नव्या तरतुदीनुसार, उमेदवाराचे चालू चाचणीतील गुण केवळ एकदाच निवडीसाठी वैध राहतील. पुन्हा निवड प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराला पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. तसेच, इयत्ता पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते दहावी या गटांसाठी उमेदवाराने दहावीची परीक्षा ज्या माध्यमातून दिली आहे, त्या माध्यमाच्या शाळेसाठीच उमेदवारी विचारात घेतली जाईल. या बदलांवर उमेदवारांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी भरती प्रक्रिया वेगवान होईल म्हणून स्वागत केले आहे. मात्र, कमाल ५० प्राधान्यक्रमांची मर्यादा उमेदवारांच्या समान संधीवर गदा आणू शकते, अशी चिंता काही उमेदवारांनी व्यक्त केली आहे. यामुळे शहरी भागांना जास्त पसंती दिली जाऊन ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांतील पदे रिक्त राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

CSB Recruitment 2026 Vacancy : सायंटिस्ट-बी पदांसाठी भरती जाहीर! CSB कडून खास भरती, त्वरित करा अर्ज

यावर शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, उमेदवार प्राधान्यक्रम नोंदवूनही नियुक्ती स्वीकारत नसल्याने अनेक पदे अडवली जात होती. त्यामुळे आता एका जागेसाठी तीन उमेदवारांचीच शिफारस केली जाणार असून गुणवत्तेला अधिक प्राधान्य दिले जाईल. या नियमावलीमुळे शहरी भागातील पदांसाठी पात्रता गुण वाढण्याची, तर दुर्गम व अवघड क्षेत्रातील पदांसाठी पात्रता गुण कमी होण्याची शक्यता आहे. तसेच, जागा रिक्त राहण्याचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Changes in teacher recruitment in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 10:48 AM

Topics:  

  • Career
  • Teacher Recruitment

संबंधित बातम्या

Chh. Sambhaji Nagar : सहकार महर्षी माणिकराव पालोदकर विद्यालयात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भावूक निरोप समारंभाचे आयोजन!
1

Chh. Sambhaji Nagar : सहकार महर्षी माणिकराव पालोदकर विद्यालयात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भावूक निरोप समारंभाचे आयोजन!

Parabhani News : दहावीच्या परीक्षेसाठी जय्यत तयारी! विद्यार्थ्यांची मोठी संख्या, या तारखेला होणार परीक्षा
2

Parabhani News : दहावीच्या परीक्षेसाठी जय्यत तयारी! विद्यार्थ्यांची मोठी संख्या, या तारखेला होणार परीक्षा

गेमर्ससाठी आनंदाची बातमी! गेमिंगमुळे आता LinkedIn प्रोफाइल Pro दिसणार; BGMI चा नवीन करिअर मोड ऑन
3

गेमर्ससाठी आनंदाची बातमी! गेमिंगमुळे आता LinkedIn प्रोफाइल Pro दिसणार; BGMI चा नवीन करिअर मोड ऑन

IGI कडून AGLचे संपादन; रंगीत रत्न सर्टिफिकेशनमध्ये जागतिक स्तरावर नवा अध्याय
4

IGI कडून AGLचे संपादन; रंगीत रत्न सर्टिफिकेशनमध्ये जागतिक स्तरावर नवा अध्याय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शिक्षक भरतीच्या नियमात बदल! याचे परिणाम काय? आधीच्या तरतुदी कोणत्या?

शिक्षक भरतीच्या नियमात बदल! याचे परिणाम काय? आधीच्या तरतुदी कोणत्या?

Feb 05, 2026 | 10:48 AM
सत्ता, गुन्हे आणि न्यायाची थरारक लढाई; ‘अमर विश्वास’ या कोर्टरूम ड्रामाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस

सत्ता, गुन्हे आणि न्यायाची थरारक लढाई; ‘अमर विश्वास’ या कोर्टरूम ड्रामाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस

Feb 05, 2026 | 10:45 AM
Mumbai Crime: विकृतीचा कळस! कांदिवलीत मादी कुत्र्यावर लैंगिक अत्याचार; कठोर कारवाईची मागणी

Mumbai Crime: विकृतीचा कळस! कांदिवलीत मादी कुत्र्यावर लैंगिक अत्याचार; कठोर कारवाईची मागणी

Feb 05, 2026 | 10:44 AM
चोरांसाठी धोक्याची घंटा! गुगलचे लाँच केले नवे स्मार्ट लॉक फीचर्स, आता फोन राहील अधिक सुरक्षित

चोरांसाठी धोक्याची घंटा! गुगलचे लाँच केले नवे स्मार्ट लॉक फीचर्स, आता फोन राहील अधिक सुरक्षित

Feb 05, 2026 | 10:21 AM
इंटरनेटवर नेहमी का द्यावा लागतो CAPTCHA? नक्की काय आहे याचे महत्त्व

इंटरनेटवर नेहमी का द्यावा लागतो CAPTCHA? नक्की काय आहे याचे महत्त्व

Feb 05, 2026 | 10:17 AM
Jalgaon Crime: जळगाव हादरलं! पद्मालय जंगलात आढळला महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह

Jalgaon Crime: जळगाव हादरलं! पद्मालय जंगलात आढळला महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह

Feb 05, 2026 | 10:02 AM
‘भारत कोणाच गुलाम नाही’ ; ट्रम्प यांच्या भारत-रशिया तेल व्यापारावरील दाव्यावर पुतिन यांनी दिलं चोख प्रत्युत्तर

‘भारत कोणाच गुलाम नाही’ ; ट्रम्प यांच्या भारत-रशिया तेल व्यापारावरील दाव्यावर पुतिन यांनी दिलं चोख प्रत्युत्तर

Feb 05, 2026 | 10:01 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Feb 04, 2026 | 03:10 PM
माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

Feb 04, 2026 | 02:58 PM
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.