Photo credit- Social Media
मुंबई: राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी भूमिका मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते वारंवार छगन भूजबळ यांच्यावर निशाणा साधत आहेत. दोघांमध्येही आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, अशातच मनोज जरांगे यांच्या बदल्या भूमिकांचा समाचार घेत छगन भूजबळ यांनी मनोज जरांगेंवर टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला अल्टिमेट दिला आहे. मराठा आरक्षणातील महत्त्वाचा मुद्दा असलेल्या सगेसोयऱ्याविषयी भूजबळांनी रोखठोक भूमिका मांडत यावर भाष्य केलं आहे.
मी कुणाकडे काहीही मागितले नाही. तर पलिकडचे लोक काय म्हणत आहेत की, ओबीसीतून आरक्षण द्या. पण मी म्हणतो की आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका. ओबीसीत 384 जाती आहेत. तुम्हीही आलात तर कुणालाच काही मिळणार नाही. पवारांशीही यासंदर्भात चर्चा झाली. मंडल आयोग आल्यावर आम्ही पवारांकडे आरक्षणाची मागणी केली होती. त्यांनी एक दीड महिन्यात आरक्षणाची अंमलबजावणी केली. त्यांना तेच सांगायला गेलो होतो. आरक्षणावर कोणीतरही घाला घालण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही ज्येष्ठ नेते आहोते. तुम्ही सांगितले तर फायदा होईल.
हेदेखील वाचा: Ganesh Chaturthi Recipe: बाप्पाला करा खुश! नैवेद्यासाठी बनवा कुरकुरीत तळणीचे मोदक
ओबीसीमध्ये मराठा समाजाला घ्यायच की नाही घ्यायचं हे विचारण्यासाठी मी पवारांची भेट घेतली. शरद पवार असोत वा उद्धव ठाकरे असोत वा काँग्रेस असो. त्यांनीही सांगावं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायंच का. ओबीसीत साडेतीनशेहून अधिक जाती असताना आता मराठा समाजालाही त्यात सामील करून घ्यायचं की नाही हे त्यांनीही सांगायला हवे. आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच मी शिवसेना सोडली. आमचा बॅकलॉग भरलेला नाही. पण मराठा समाजाला १० टक्के टिकणारं आरक्षण दिलं. त्यात फक्त मराठा समाज आहे. पण ओबीसीत साडेतीनशे जाती आहेत.
सगेसोयऱ्यांबाबत बोलताना भूजबळ म्हणाले, सगेसोयऱ्यांचा अध्यादेश अजून काढलेला नाही. अधिसुचनाही काढलेले नाही, असे करण्यासाठी लोकांच्या हरकती, ना हरकती मागवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत साडेआठ लाख हरकती आल्या आहेत. पण त्यात असे करू नये असे सुचवण्यात आल्याचे भूजबळांनी म्हटले आहे.
हेदेखील वाचा: भाजपवर टीका करणारे रामदास कदम नरमले: काय आहे कारण?
मी रिबेरो, अणे साहेब, कुंभकोणी यांनाही आरक्षणाबद्दल विचारलं. तर त्यांनीही असे करू नये, असे झाले तर कोणीही कोणाच्याही आरक्षणात जाऊल, दलित, मुस्लिम, ब्राम्हण समाजही येतील, पण मला वाटतं सगेसोगरे काही होणार नाही. झालं तरी ते कोर्टाच एक मिनिटही टिकणार नाही. असेही भूजबळांनी म्हटले आहे.