Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छ. संभाजीनगरमध्ये मान्सून लांबला; सरासरीच्या केवळ ३६ टक्के पाऊस, शेतकरी चिंतेत; कृषी विभागाचा पेरणीबाबत महत्त्वाचा सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मान्सून लांबल्याने १ ते ८ जून दरम्यान सरासरीच्या केवळ ३६.५ टक्के पाऊस झाला आहे. अल निनोच्या सावटामुळे शेतकरी चिंतेत असून पुरेशा पावसाशिवाय पेरणी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 09, 2026 | 02:32 PM
छ. संभाजीनगरमध्ये मान्सून लांबला; सरासरीच्या केवळ ३६ टक्के पाऊस

छ. संभाजीनगरमध्ये मान्सून लांबला; सरासरीच्या केवळ ३६ टक्के पाऊस

Follow Us
Follow Us:
  • छ. संभाजीनगरमध्ये मान्सून लांबला
  • सरासरीच्या केवळ ३६ टक्के पाऊस, शेतकरी चिंतेत
  • कृषी विभागाचा पेरणीबाबत महत्त्वाचा सल्ला
छत्रपती संभाजीनगर: मागील वर्षी धो-धो बरसल्यानंतर यंदा पावसाची कमी हजेरी राहणार असल्याचे बोलले जात आहे. ७ जून रोजी मृग नक्षत्र लागला मात्र मान्सूनने अद्याप शहरात आगमन केलेले नाही. मराठवाड्यात येण्यासाठी आणखी तीन ते चार दिवसांचा अवधी लागणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. १ जूनपासून जिल्ह्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसानेही सरासरी गाठलेली नाही. दरम्यान, उकाड्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना आता पावसाची आतुरतेने प्रतीक्षा लागली आहे.

विभागी आयुक्तालयातून प्राप्त आकडेवारीनुसार, १ जूनपासून जिल्ह्यात केवळ १२. २ मिमी पाऊस झाला आहे. अंदाजे ७ जूनच्या आसपास मान्सून राज्यात प्रवेश करतो. मात्र यंदा यात उशीर होणार असल्याची शक्यता आहे. १ ते ८ जूनपर्यंत संभाजीनगर जिल्ह्याची सरासरी ३३. ४ मिमी इतकी आहे. तर पडलेला पाऊस केवळ १२. २ मिमी इतका आहे. म्हणजेच सरासरीच्या तुलनेत ३६. ५ टक्केच पाऊस झाला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना हे चिंतीत करणारे ठरू शकते. मान्सून आगमनानंतर पुढील दिवसात पावसाने जोरदार वृष्टी करणे गरजेचे असणार आहे.

पावसाळ्याचे जून ते सप्टेंबर या चार महिन्यात जिल्ह्याची सरासरी ५८१. ७मिमी इतकी आहे. गेल्या आठ दिवसात यातील केवळ २. १ मिमी पर्यंत मजल पावसाने मारली आहे. पुढील दिवसात समाधानकारक पाऊस न झाल्यास याचा परिणाम पिण्याच्या पाण्यासह, सिंचन आणि उद्योगांवर होणार आहे. त्यामुळे विशेषक करून शेतकऱ्यांचे लक्ष मान्सूनकडे लागून आहे.

जायकवाडीची जलपातळी घटल्याने संभाजीनगरच्या २७४० कोटींच्या नवीन पाणी योजनेला मोठा झटका; १२ जूनचा वाढीव पाणीपुरवठा रखडणार?

मराठवाड्यातदेखील जिल्ह्यासोबतच पावसाने सरासरी गाठलेली नाही. प्राप्त आकडेवारीनुसार, १ ते ८ जूनदरम्यान विभागाची सरासरी ३५. ७ मिमी इतकी आहे. तर आजपर्यंत ३०. ४ मिमी पाऊस पडला आहे. म्हणजेच सरासरीच्या केवळ ८५.२ टक्के पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यासोबतच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पावसाची आतुरतेने प्रतीक्षा लागून आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीसाठी थांबल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यात रविवारी पडला ०.२ मिमी पाऊस

प्राप्त आकडेवारीनुसार, १ जूनपासून जिल्ह्यात १२. २ मिमी पाऊस झाला आहे. या आठ दिवसात जिल्ह्याच्या बहुतेक सर्वच सर्कलमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी दिली होती. मान्सूनच्या वाटचालीचा परिणाम म्हणून रविवारी जिल्ह्यात केवळ ०.२ मिमी पाऊस झाला आहे.

शेतकरी झाले चिंतातूर

यंदा अल निनोच्या परिणामुळे कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास याचा फटका शेतीक्षेत्राला होणार आहे. आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना हे त्रासदायक ठरू शकते. अनेक शेतकऱ्यांनी पेरण्याची पूर्वतयारी पूर्ण करून ठेवली आहे. तर काहींनी मान्सूनपूर्व पावसाच्या भरवश्यावर पेरण्या सुरु केल्या आहेत. जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाल्यानंतरच बियाणांच्या उगवणीसाठी हे फायदेशीर ठरते. यामुळे मान्सूनच्या पावसाच्या काही दिवसांनी पेरण्यांना सुरुवात करावी, असे आवाहन करण्यात आले.

Chhatrapati Sambhajinagar: मराठवाड्यात १५ जूनपर्यंत मान्सूनच्या पावसाची शक्यता कमीच शेतकऱ्यांनो, खरिप पेरणीची घाई करू नका

Web Title: Chhatrapati sambhajinagar monsoon delayed rain deficit marathwada agriculture department advisory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • farmer
  • mansoon
  • Marathwada
  • Weather Update

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert: राज्यात नुसता धुमाकूळ; तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची तर…, घाट माथ्यावर मुसळधार
1

Maharashtra Rain Alert: राज्यात नुसता धुमाकूळ; तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची तर…, घाट माथ्यावर मुसळधार

Chhatrapati Sambhajinagar: Instagram वर झाली मैत्री अन् आयुष्य उद्ध्वस्त! विवाहितेचे अपहरण करून 24 तास डांबले; वारंवार अत्याचार
2

Chhatrapati Sambhajinagar: Instagram वर झाली मैत्री अन् आयुष्य उद्ध्वस्त! विवाहितेचे अपहरण करून 24 तास डांबले; वारंवार अत्याचार

पुणेकरांनो लक्ष द्या ! पुणे आणि परिसरासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा
3

पुणेकरांनो लक्ष द्या ! पुणे आणि परिसरासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा

मनपासमोरून रिक्षा चोरली, 10 वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण केले अन्…
4

मनपासमोरून रिक्षा चोरली, 10 वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण केले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.