बैठकीत एजन्सीच्या प्रतिनिधींनी विलंबाची कारणे मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावर नाराजी व्यक्त करत तुमची डेडलाईन आधीच संपली आहे. आता कारणे नकोत, काम पूर्ण करा, अशा शब्दांत आयुक्तांनी एजन्सीला फटकारले. तसेच एप्रोच चॅनेलचे रखडलेले कामही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी शहरातील निकामी झालेल्या व्हॉल्वची संपूर्ण जबाबदारी संबंधित एजन्सीवरच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. नवीन व्हॉल्वची ऑर्डर वेळेत पोहोचण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. व्हॉल्व उपलब्ध होताच नियोजित शटडाऊन घेऊन पुढील पाच दिवसांत बदलाची सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले. बैठकीला विशेष कार्यकारी अधिकारी ए. बी. देशमुख, के. एम. फालक, अतिरिक्त शहर अभियंता अनिल तनपुरे, कार्यकारी अभियंता सचिन वाईकर, सर्व कनिष्ठ अभियंते, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार रामधन जाधव, योगेश काळे, जीव्हीपीआरचे सिद्धांत ठाकरे, आशुतोष पांडेय तसेच एमजेपीचे राम नारायण यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. जॅकवेलवरील कामात आणखी विलंब होऊ नये म्हणून संबंधित एजन्सी, एमजेपी आणि महापालिकेच्या अभियंत्यांनी गुरुवारी रात्रीच आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.
रात्री काम शक्य न झाल्यास शुक्रवारी सूर्योदयापासून काम सुरू करून सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पंम्पिंग सुरू करणे बंधनकारक असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. कामाच्या विलंबाबाबत एजन्सीकडून कारणे मांडली जात असतानाच आयुक्त अमोल येडगे यांनी ती फेटाळून लावत, दिलेली मुदत आधीच संपल्याचे स्पष्ट केले. आता स्पष्टीकरण नव्हे तर प्रत्यक्ष काम पूर्ण होणे महत्त्वाचे असल्याचे सांगत एप्रोच चॅनेलचे कामही तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले.
नवीन व्हॉल्व उपलब्ध होताच नियोजित शटडाऊन घेऊन पुढील पाच दिवसांत बदलाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. शहरातील निकामी व्हॉल्वची जबाबदारी संबंधित एजन्सीवरच राहणार असून, नवीन व्हॉल्व वेळेत उपलब्ध होतील यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.






