मुंबई : राज्यात सत्तांतर झाले आहे. मागील आठवड्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर दोन दिवसीय विशेष अधिवेशन (Special Adhiveshan) बोलावण्यात आलं होतं. विधानसभा अध्यक्षांच्या (Speaker of the Assembly) निवडीनंतर सोमवारी शिंदे-फडणवीस (Shinde-fadnvis government) सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. त्यानंतर आता वारीच्या तोंडावर नवीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा होणार आहे. त्यानिमित्त नवर्निवाचित मुख्यमंत्र्यांनी आज आषाढी एकादशीची वारीनिमित्त आढावा घेतला.
[read_also content=”खासदार भावना गवळींची प्रतोद पदावरून उचलबांगडी, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांना संजय राऊतांचे पत्र https://www.navarashtra.com/india/mp-bhavana-gawli-resignation-from-office-letter-to-pralhad-joshi-301353.html”]
दरम्यान, ज्या गाड्या आपल्या पंढरपूरला जात आहेत. कोकणात गणपतीला गाड्या जायच्या तेव्हा आपण ज्याप्रकारे स्टीकर देत होतो, तसेच स्टीकर आपण वारकरी सांप्रदायांनी गाडी नंबर आणि नावाची नोंदणी करावी. तसेच ट्रोल फ्री करण्यासाठी मुख्य सचिवांना मी सूचना दिल्या आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच मागील दोन वर्ष आषाढी वारी झाली नव्हती. त्यामुळे वारकरी आता पंढरपुरला जाणार आहेत. त्यामुळे अगदी औषध, ट्रॅफीकपासून प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. निधीची व्यवस्था करण्याची सूचना सुद्धा मुख्य सचिवालयांना देण्यात आली आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.