मयुर फडके, मुंबई : बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Bollywood famous actor Nawazuddin Siddiqui) त्याची विभक्त पत्नी (estranged wife) यांनी आपापसातील वादावर उच्च न्यायालयाच्या मध्यस्थीनंतर (High Court Arbitration) सकारात्मक तोडगा काढू (Make a positive decision) असा तोंडी शब्द खंडपीठाला दिला.
१२ वर्षांची मुलगी आणि सात वर्षांचा मुलगा यांबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसून विभक्त पत्नी झैनबला त्यांची माहिती उघड करण्याचे आदेश द्या, अशी मागणी करणारी हेबियस कॉर्पस (संबंधित व्यक्तीला हजर करण्यासाठी) याचिका नवाजुद्दीनने उच्च न्यायालयात केली आहे.
[read_also content=”दापोली साई रिसॉर्ट प्रकरण : सदानंद कदम यांना याचिका सुधारण्यास परवानगी, तीन नवीन नोटिसींना आव्हान देण्यास उच्च न्यायालयाची मुभा https://www.navarashtra.com/maharashtra/dapoli-sai-resort-case-sadanand-kadam-allowed-to-amend-plea-hc-allowed-to-challenge-three-new-notices-nrvb-380736.html”]
त्यावर हे कौटुंबिक प्रकरण असल्याने याचिकाकर्ता-प्रतिवादींनी आपल्या दोन अल्पवयीन मुलांसह सुनावणीसाठी न्यायमूर्तींच्या दालनात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाच्या दालनात सोमवारी संध्याकाळी सुनावणी पार पडली. नवाजुद्दीन मात्र काही कारणास्तव व्हीसी मार्फत सुनावणीला हजर होता.
तेव्हा, दोन्ही पक्षकारांनी न्यायालयाच्या मध्यस्थी नंतर काही अटीशर्तींनुसार आगामी काळात आपली वागणूक चांगली ठेवण्याचे मान्य केले. त्यांची दखल घेऊन खंडपीठाने सुनावणी तहकूब केली.
[read_also content=”धक्कादायक! दिल्ली मेट्रोमध्ये दिसली ‘बिकिनी’ गर्ल , व्हिडिओने सोशल मीडियावर तापमान वाढलं https://www.navarashtra.com/viral/shocking-viral-bikini-girl-seen-in-delhi-metro-video-creating-sensation-on-social-media-nrvb-380641.html”]