चिपळूण बसस्थानकाच्या कामाचे वाजले तीनतेरा (फोटो- सोशल मीडिया)
निधी पुरेसा नसल्याने काम उरकण्याचा पर्याय
प्रवाशांमध्ये उसळली संतापाची लाट
आराखड्यात ‘पत्रा प्लॅन’; बांधकामाचे तीनतेर
चिपळूण: कोकणातील मध्यवर्ती ठिकाण आणि २४ तास बस सेवा देणारे चिपळूण बसस्थानक नव्या स्वरूपात उभे राहणार अशी मोठमोठी आश्वासने देण्यात आली होती. परंतु निधीअभावी हे काम अध्यांवर लटकले असतानाच आता इमारतीच्या हायटेक आराखड्यात बदल करून दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब रद्द करण्याचा आणि त्याऐवजी पत्रा शेड बसविण्याचा प्रस्ताव एस.टी महामंडळाकडून ठेवण्यात आला आहे. चिपळूण आगाराच्या या पत्रा प्लॅनमुळे प्रवाशांनाही तीव्र नाराजी व्यक्त करावी लागत आहे. २०१८ पासून जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी आणि लांजा या तीन प्रमुख बसस्थानकांच्या (MSRTC) नत्या इमारतीचे काम आहे.
यातील रत्नागिरी बसस्थानकाचे काचे काम पूर्णत्वास गेले असले तरी चिपळूण येथे कधी निधीअभावी तर कधी ठेकेदार बदलामुळे काम रखडले. ७ वर्षात या बस स्थानकाचे ४० टक्के कामही पूर्णत्वास गेलेले नाही, ४ वर्षांहून अधिक काळ अर्धवट इमारत उभी राहिल्यानंतर लोखंड गंजल्याने सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. सुधारणा करण्यासाठी पुन्हा काम सुरू झाले, मात्र आता हायटेक दुमजली इमारत बनवण्याचा प्लॅनच पालटला गेला. नियंत्रण कक्ष, प्रवासी सुविधा, आधुनिक कार्यालय हे सर्व ज्या दुसन्या मजल्यावर होणार होते.
St Mahamandal : एसटी महामंडळ नवीन आठ हजार बस खरेदी करणार, प्रताप सरनाईक यांची घोषणा
आता मंजुरीची प्रतीक्षा
तो मजला आता रद्द ! आता पत्रा शेड बसवून खची कमी करण्याचा प्रस्ताव अभियंता विभागाने पुढे ढकलला असून मंजुरीची प्रतीक्षा आहे. मंजुरी मिळेपर्यंत काम ठप्प झाले आहे. चिपळूणच्या हायटेक बसस्थानक उभारणीच्या कामासाठ २०१६-१७ च्या दरानुसार २ कोटी ९० लाखांची मंजूरी मिळाली होती. मात्र बांधकाम साहित्याच्या दरवाढीमुळे हा निधी पुरेसा नसल्याने आराखड कमी जास्त करून काम केवळ उरकण्याचा पर्याय घेतला जात आहे.
याला बसस्थानक म्हणायचे की साधी शेड?, प्रश्न उपस्थित
हायटेक सुविधा असलेले बसस्थानक म्हणायच की साधी शेड ? प्रवाशांसाठी २४ तास तास सुरु असणाऱ्या या ठिकाणी सोयीसुविधांची पातळी सुधारायला वषानुवर्ष प्रवाशाना फसवल जातय, अशी प्रतिक्रिया प्रवाशांतून व्यक्त होत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अत्यंत महत्वाचे बसस्थानक म्हणून चिपळूणचं स्थानक असून प्रत्येक वर्षी पूरस्थितीतही तेव आशास्थान असते अशा बस स्थानकाच्या उभारणीत काटकसर का? असा प्रश्नही संतप्त नागरिक विचारत आहेत.






