चिपळूणमध्ये भाजपचे उमेदवार जाहीर (फोटो- सोशल मीडिया)
चिपळूणमधील भाजपाचे उमेदवार जाहीर
जि.प.साठी ३ तर प.स.साठी ७ उमेदवार रिंगणात
जिल्हा परिषद गटासाठी देखील उमेदवारी जाहीर
चिपळूण: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली, भाजपा-शिवसेना युतीच्या माध्यमातून चिपळूणमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढविली जाणार असून भाजपाकडून ३ जिल्हा परिषद गट तर ७ पंचायत समिती गणात उमेदवार उभे केले जाणार आहेत. भाजपाचे नेते माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजपाचे नेते प्रशांत यादव आणि जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या नेतृत्कखाली चा निवडणुका लढविल्या जाणार आहेत. नगरपालिका निवडणुकीत चांगले यश मिळाल्याने भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकत्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.
चिपळूणमधील भाजपाचे उमेदवार जाहीर
महानगरपालिकांमध्ये राज्यभरात भाजपाला मोठे यश मिळाल्याने जिप व पंसची निवडणूक लढविण्याकरिता व युतीच्या विजयाचा भगवा फडविण्याकरिता भाजपाचे पदाधिकाप्ती व कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. भाजपाचे नेते माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजपचे नेते प्रशांत यादव आणि जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढविण्यासाठी उमेदवारही सब झाले असून, भारतीय जनता पार्टीने आपले उमेदवार जाहीर केले. यात पेढे जिल्हा परिषद गटासाठी दीप्ती दीपक महाडिक, खेर्डी जिल्हा परिषद गटासाठी रावी सतीश मोरे आणि उमरोली जिल्हा परिषद गटासाठी योगेश चंद्रकांत शिर्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
पंचायत समिती गणासाठी यांना मिळाली उमेदवारी
तसेच कळवंडे पंचायत समिती गणासाठी सायती सुनील वाजे, खेडी पंचायत समिती गासाठी विनोद जयवंत भुराण पिपळी खुर्द पंचायत समिती गणासाठी सुप्रिया सुनील देवरुखकर, वेहेचे पंचायत समिती गणासाठी राम दशरथ राजेशिर्के, शिरगाव पंचायत समिती गणासाठी नयना उदय पवार, गुढे पचायत समिती गणासाठी आराध्या अमोल रावणग आणि कुटरे पंचायत समिती गगावठी अक्षता राजाराम होथले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Maharashtra Politics: भाजपला मोठे भगदाड? ‘या’ निवडणुकीत डावलले गेल्याने…
युतीचा भगवा फडकवण्यात यावा…
भाजपाचे नेते माजी आमदार डॉ. विनय नातु, भाजपाचे नेते प्रशांत यादव व जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी सर्व उमेदवारांना निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या व भाजपा-शिवसेना युतीच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर युतीचा भगवा फडकवूया, असे आवाहनही त्यांनी केले.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






